ब्रेकिंग
कोल्हे गटाचे सुनील थोरात यांची जवळके ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड
कोल्हे गटाचे सुनील थोरात यांची जवळके ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे सुनिल वामन थोरात यांची बिनविरोध निवड झाली आहे.

जवळके ग्रामपंचायतीची नुकतीच निवडणुक झाली.यात जवरे गट व कोल्हे गट युतीच्या स्थानिक परिवर्तन ग्रामविकास पॅनलला सरपंचपद व पाच सदस्य निवडुन स्पष्ट बहुमत मिळाले होते.नुतन सरपंच सारीका थोरात यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या निवडीत उपसरंपच म्हणुन सुनिल थोरात यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंतायत सदस्य इंदुबाई शिंदे,मिना थोरात,भाऊसाहेब थोरात,वनिता थोरात,रोहीणी वाकचौरे,नवनाथ थोरात उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सोहन चौधरी तर सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन राजेंद्र रहाणे यांनी काम पाहीले.

यावेळी माजी सरपंच बंडूभाऊ थोरात, नानासाहेब जवरे,एस.के.थोरात,वाल्मिक भोसले,रामनाथ थोरात,बाबासाहेब थोरात,गोरक्षनाथ थोरात,दत्तात्रय थोरात,वसंत थोरात,विश्वनाथ थोरात, परसराम शिदे,संतोष थोरात, वाल्मीक भोसले,सखाहरी थोरात,सुधाकर थोरात, जयराम वाकचौरे, दत्तात्रय वाकचौरे,बबन थोरात, वाल्मीक थोरात, रखमा वाकचौरे,नवनाथ थोरात,महेश थोरात आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.