थोरात कारखान्याची पहिली उचल 2800 रुपये प्रति टन

संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार यांचे हित जपले असून उच्चांकी भाव दिला आहे .सन 2023- 24 या गळीत हंगामासाठी पहिली उचल 2800 रुपये प्रति टन देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ओहोळ म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना हा देशातील सहकारी कारखान्यासाठी मार्गदर्शक ठरला आहे.
अत्यंत अडचणीच्या काळातही कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला असून सन 2023- 24 या गळीत हंगामात येणाऱ्या उसाकरता पहिली उचल 2800 रुपये प्रति टन दिली जाणार आहे.

कारखान्याने दिवाळीतही शेतकरी कामगार यांच्यासाठी अत्यंत चांगले निर्णय घेतले आहेत. या कारखान्यावर सभासद शेतकरी व कार्यक्षेत्राबाहेरील ऊस उत्पादक यांचाही मोठा विश्वास असून कारखान्याने मागील वर्षी 10 लाख मे टन गाळप केले आहे. यावर्षी दुष्काळजन्य परिस्थिती असूनही शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहे .ऊस उत्पादन वाढीकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.

2024 हे थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या हंगामासाठी प्रति टन 2800 रुपये पहिली उचल दिल्याने ऊस उत्पादक व शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असून कारखान्याच्या वतीने ऊस विकास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन संतोष हासे, सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.

कारखान्याच्या संचालक मंडळाने घेतलेल्या या निर्णयाने सर्व ऊस उत्पादक व शेतकरी वर्गामध्ये मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.