ब्रेकिंग

मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून चोरीचा गुन्हा उघडकीस

चोरीस गेलेला संपूर्ण मुददेमाल हस्तगत

जाहिरात – 7756045359
मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून चोरीचा गुन्हा उघडकीस

मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून चोरीचा गुन्हा उघडकीस

 चोरीस गेलेला संपूर्ण मुददेमाल हस्तगत

चाळीसगांव । विनोद जवरे ।  08/06/2025 रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन येथे तक्रारदार नामे प्रितम पुरुषोत्तम बागुल वय – 26 वर्षे, रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगांव यांनी त्यांचे मालकीचे सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. 19 ई. ए. 3234 हे शेडमध्ये लावून ठेवलेले असताना कोणीतरी अज्ञात इसमाने सदर ठिकाणी येवून नमुद ट्रॅक्टरचे ट्रॉली जोडण्याचे डाबर व पिना तसेच रोटर नांगर जोडण्यासाठी आवश्यक असणारे आडवे उभे हात असे एकूण 50.000/- रुपये किंमतीचे स्पेअर पार्ट खोलून चोरुन नेलेबाबत दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि. 137/25 भा.न्या.सं. कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव मा. श्रीमती कविता नेरकर सो, व उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग, (चार्ज चाळीसगांव उप विभाग) मा. श्री धनंजय येरुळे सो, यांनी पोलीस स्टेशन हददीत घडणारे चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुददेमाल हस्तगत करणे बावत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.

जाहिरात – 7756045359

मा. वरिष्ठांच्या सुचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रभारी अधिकारी श्री प्रविण अ. दातरे, सहायक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपणीय माहीतीच्या आधारे कौशल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणून संशयित आरोपी नामे 1. प्रवीण जालींधर पाटील वय 28 वर्षे, 2. दिलीप श्रीराम निकम वय 22 वर्षे दोघे रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगांव जि. जळगांव यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली होती. नमुद दोन्ही आरोपींना मा. न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांड मध्ये घेवून, त्यांचेकडे गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हयाची कबुली देवून गुन्हयातील नमुद ट्रॅक्टरचे चोरी केलेले एकूण 50,000/- रुपये किंमतीचे नमुद स्पेअर पार्ट काढून दिले असून ते जप्त करण्यात आलेले आहेत. सदरची कामगिरी मा. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी  प्रविण अ. दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक  सुहास आव्हाड, पोहेकॉ मोहन सोनवणे, किशोर पाटील, शांताराम पवार, पोकों विनोद बेलदार यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!