ब्रेकिंग
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला निंदानिय – आमदार थोरात
सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावरील हल्ला निंदानिय – आमदार थोरात

संगमनेर (प्रतिनिधी) शिक्षण क्षेत्रात काम करणारे पुरोगामी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य हेरंब कुलकर्णी यांच्यावर झालेला हल्ला हा अत्यंत निंदनीय असून या हल्ल्यातील गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करा. अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे आमदार थोरात या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, हेरंब कुलकर्णी हे आमचे स्नेही असून पुरोगामी विचारांचे आहेत. शिक्षण क्षेत्रात त्यांनी अत्यंत उत्कृष्ट काम केले असून समाजासाठी सातत्याने त्यांचे मोठे योगदान राहिले आहे .अशा पुरोगामी विचारांच्या सामाजिक कार्यकर्त्यावर नगरमध्ये हल्ला होतो आहे. हे अत्यंत निंदनीय आहे. आणि दोन दिवस होऊनही हल्लेखोर सापडत नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याबाबत आपण पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी फोनवरून बोललो असून तातडीने घटनेची चौकशी करावी व हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
याचबरोबर दिवसेंदिवस अहमदनगर शहरांमध्ये वाढणारी गुन्हेगारी ही अत्यंत चिंताजनक आहे. यामुळे सामान्य नागरिक असुरक्षित झाला असून हे जिल्ह्यासाठी अशोभनीय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.यावर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आमदार थोरात यांना सांगितले की ,आपण हेरंब कुलकर्णी यांना भेटून आलो आहोत. आणि लवकरात लवकर हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल