ब्रेकिंग

प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली  ९९८कोटी ५८लाख रूपयांच्या निधीस  मान्यता – मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील 

प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली  ९९८कोटी ५८लाख रूपयांच्या निधीस  मान्यता – मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील 

अहील्यानगर । प्रतिनिधी । महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत अहील्यानगर जिल्ह्यातील गोदावरी कुकडी भोजापूर तसेच प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या कामाकरीता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकूण ९९८कोटी ५८लाख रूपयांच्या निधीस मान्यता दिली असल्याची माहीती जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.अहील्यानगर मधील सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी महायुती सरकराचा ऐतिहसिक निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले.

जाहिरात – 7756045359

राज्यातील ७५अपूर्ण आणि १५५पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणाली मध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्पाच्या कामांना महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाच्या माध्यमातून निधी मंजूर झाला असून जिलह्याच्या सिंचन व्यवस्थेच्या दृष्टिने ऐतिहसिक बाब असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. या निर्णयाची सविस्तर माहीती देतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,गोदावरी उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी यापुर्वी महायुती सरकारने १९१.५८कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.यामध्ये अधिकच्या १५०कोटी रुपयांच्या वाढीव निधीस मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याने गोदावरी कालव्यांसाठी आता ३४५.५८कोटी रुपयांच्या निधीची तरतूद झाली आहे.

कृष्णा खोरे अंतर्गत येणार्या कुकडी प्रकल्पासाठी यापुर्वी २४९कोटी मंजूर होते या प्रकल्पासाठी २००कोटीचा वाढीव निधी उपलब्ध होणार असल्याने कुकडी प्रकल्पासाठी पहील्यादांच एकूण ४४९कोटी निधी मंजूर झाला असून लाभक्षेत्रातील शेतकर्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.संगमनेर तालुक्यातील भोजापूर चारीचा प्रश्न चाळीस वर्षापासून प्रलंबित होता.महायुती सरकार सतेवर आल्यानंतर चारीची दुरुस्ती करण्यास प्राधान्य देवून प्रथम पाणी आणण्यात यश आले.या चारीच्या कामाला राज्य सरकारने १४कोटी रुपये मंजूर केले होते.महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमात नव्याने या प्रकल्पाचा समावेश करण्यात आला,या प्रकल्पाच्या वितरण प्रणालीसाठी नव्याने ३०कोटी रुपये देण्याचा ऐतिहसिक निर्णय झाल्याने तालुक्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शासन निर्णयाचा मोठा लाभ होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.प्रवरा डाव्या व उजव्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी १५०कोटी रुपये मंजूर झाले असून या कामाचा नव्याने समावेश सिंचन सुधारणा कार्यक्रमात करण्यात आला होता.जुन्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी या निधीचा उपयोग आणि आवर्तनाची वहन क्षमता चांगली होण्यास मदत होईल अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!