जवळकेच्या कांचन थोरात यांची सहाय्यक व्यवस्थापक पदी बँकेत निवड
जवळकेच्या कांचन थोरात यांची सहाय्यक व्यवस्थापक पदी बँकेत निवड

कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील जवळके गावचे माजी सरपंच बंडुभाऊ थोरात व माजी सरपंच सिंधुताई थोरात यांची कन्या कांचन थोरात यांची नुकतीच बँकिंग क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या आय.डी.बी.आय बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक म्हणून निवड झाली आहे.

कांचन थोरात यांचे प्राथमिक शिक्षण जवळके शाळेत तर माध्यमिक शिक्षण औताडे महाविद्यालयात व उच्च माध्यमिक शिक्षण श्री गणेश महाविद्यालयात पूर्ण झाले असून बारावीनंतर कांचन थोरात यांनी आपले शिक्षण मालदड येथील कृषी महाविद्यालयात पूर्ण करत खडतर परिस्थितीमध्ये आपल्या हुशारीच्या जोरावर संभाजीनगर येथील शुभम सर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकिंग क्षेत्राचा अभ्यास करत परीक्षा देत यश संपादन केले आहे.कांचन थोरात यांच्या यशाबद्दल कोपरगाव तालुक्याच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, जवळके गावचे उपसरपंच सुनील थोरात, आदिसह जवळके गावच्या ग्रामस्थांनी कांचन थोरात यांचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.



