ब्रेकिंग

जेसीबीतून फुलांची उधळण करत देवकौठे ग्रामस्थांनी केले आ थोरात यांचे अभूतपूर्व  स्वागत

निळवंडेच्या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही- आ. थोरात

जेसीबीतून फुलांची उधळण करत देवकौठे ग्रामस्थांनी केले आ थोरात यांचे अभूतपूर्व  स्वागत

संगमनेर । विनोद जवरे ।

नवरात्र उत्सवानिमित्त सर्वत्र झालेली आकर्षक रोषनाई, सुवासिनींकडून औक्षण, फटाक्यांची आतिषबाजी, पारंपारिक वाद्य, लेझीम पथक, भव्य दिव्य मिरवणूक आणि अलोट गर्दीत जेसीबीतून फुलांची उधळण करत देवकौठे ग्रामस्थांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभूतपूर्व स्वागत केले असून निळवंडे पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही असे प्रतिपादन मा महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


देवकौठे येथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित सोसायटीच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा व विविध विकास कामांचा शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी यावेळी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ सुधीर तांबे,  जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे, रामहरी कातोरे ,मिलिंद कानवडे, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, सचिन दिघे, अनिल कांदळकर,  दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे, नाशिक महानगरपालिकेचे नगरसेवक भागवतराव आरोटे, इंजिनिअर सुभाषराव सांगळे, एकनाथ शेठ मुंगसे , राजेंद्र कहांडळ ,चेअरमन ज्ञानेश्वर मुंगसे, हौशीराम सोनवणे, नवनाथ आरगडे, अविनाश सोनवणे, संपतराव डोंगरे,राजेंद्र मुंगसे, मच्छिंद्र सांगळे, अनिल गाजरे, सौ ज्योती मोकळ सौ .जिजाबाई मुंगसे, आदींसह तळेगाव भागातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले की, अनेक अडचणींवर मात करून आपण दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण पूर्ण केले आहे. आपल्याच कार्यकाळात कालव्यांची कामे पूर्ण झाली असून फक्त पाणी सोडणे बाकी होते .परंतु श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले. जीवनात निळवंडे धरण व कालवे पूर्ण झाल्याचा आनंद असून हे पाणी लाभ क्षेत्रातील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जाईल तो आपला आनंदाचा दिवस असेल. सध्या निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे. संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून प्रत्येक गावच्या वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. तालुक्यातील रस्त्यांच्या 77 कोटींच्या निधीला स्थगिती दिली होती सुप्रीम कोर्टात जाऊन ती स्थगिती उठवली आहे. येत्या काळात रस्त्यांची कामे ही पूर्ण होतील.  आपण कधीही कुणाचे वाईट केले नाही .चांगले काम करणे ही आपली परंपरा आहे . काही महिने अडचणीचा काळ असला तरी आगामी काळात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचेही ते म्हणाले .तर मा. आ. डॉ. तांबे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आमदार बाळासाहेब थोरात यांनी विकासाच्या योजना राबवल्या आहेत. निळवंडे धरण व कालव्यांची कामे ही त्यांनीच पूर्ण केली असून तेच पाणी देणार आहेत .काही लोक या कामाचे श्रेय घेऊ पाहत आहे. परंतु जनता त्यांना ओळखून आहे. देव कवठे गावाने कुकूटपालन व दुग्ध व्यवसायातून मोठी आर्थिक क्रांती केली असून हे काम इतरांसाठी आदर्शवत असल्याचेही ते म्हटले आहे.
यावेळी राजहंस दूध संघाचे संचालक भारत शेठ मुंगसे, नगरसेवक भागवतराव आरोटे, इंजिनिअर सुभाषराव सांगळे, राजेंद्र कहांडळ ,ज्ञानेश्वर मुंगसे, यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.याप्रसंगी दत्तू दादा मुंगसे, शिवाजी आरोटे, संपत आरोटे, बाबासाहेब गाजरे, कारभारी मुंगसे,तुकाराम कहांडळ, अण्णासाहेब मुंगसे, रामनाथ धाकतोडे, सौ अलका मुंगसे ,सौ संगीता कहांडळ, सचिव शांताराम आरोटे, तालुका विकास अधिकारी अशोकराव थोरात, चांगदेव ढेपे , प्राचार्य हरिभाऊ दिघे ,श्रीराम मुंगसे ,साहेबराव कहांडळ, आदींसह विविध पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाषराव सांगळे यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर एकनाथ शेठ मुंगसे यांनी आभार मानले .
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!