सोमैया महाविद्यालयात नविन अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता

सोमैया महाविद्यालयात नविन अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता
सोमैया महाविद्यालयात नविन अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता
सोमैया महाविद्यालयात बी. एस्सी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML), बी. एस्सी. इन डेटा सायन्स व एम. एस्सी. इन ऍनालिटिकल केमिस्ट्री या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची मान्यता
कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव के. जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात बी. एस्सी. इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AI & ML), बी. एस्सी. इन डेटा सायन्स व एम. एस्सी. इन ऍनालिटिकल केमिस्ट्री हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.
याविषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. ठाणगे म्हणाले की, उपरोक्त अभ्यासक्रम हा तीन वर्षांचा असून यासाठी संस्थेने आर्टीफिशियल इंटलिजन्स विषयाची अद्यावत प्रयोगशाळा देखील उभारण्यात आली आहे. ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेने अत्यंत माफक फी मध्ये वरील अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या १००% संधी आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या नवीन अभ्यासक्रमात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या व्यापक संधी उपलब्ध होतील. तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात ‘ए. आय.’ चा प्रभाव वाढत असून तरुणांना त्यादृष्टीने आय. टी., उद्योग-व्यवसाय, बँकिंग, शेती, मेडिकल आदी क्षेत्रात ए. आय. व डेटा सायन्सचा वापर झपाट्याने वाढत असल्याने तरुणांनी त्या दिशेने पाऊल टाकणे महत्त्वाचे ठरणार आहे. तरी कोपरगाव शहर आणि परिसरातील तरुणांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी करत रोजगाराभिमुख, कालसुसंगत आणि करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे, सचिव मा. ऍड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.