नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोदावरी दूध संघावर विविध कार्यक्रमांचे आयोजन

नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोदावरी दूध संघावर विविध कार्यक्रमांचे आयोजन
नामदेवराव परजणे पाटील यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गोदावरी दूध संघावर विविध कार्यक्रमांचे आयोजन
कोपरगांव । प्रतिनिधी । गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या २१ व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संघाच्या कार्यस्थळावर रविवार दि. २२ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता दुग्धविकासमंत्री ना. अतुल सावे व कृषीमंत्री ना. माणिकराव कोकाटे तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम पार पडणार असून या कार्यक्रमांसाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले.
गोदावरी दूध संघाला वर्षभरात सर्वाधिक दूध पुरवठा, स्वच्छ व निर्भेळ दूध पुरवठा, दूध उत्पादकांना सर्वाधिक दर देणाऱ्या दूध संस्थांचा सन्मान, सर्वाधिक कृत्रिम गर्भधारणा करणारे कृत्रिमरेतन तज्ज्ञांचा सन्मान तसेच अपघाती निधन पावलेल्या संघातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रकमेच्या धनादेशाचे वितरण मंत्रीमहोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संघाच्या कार्यस्थळावर सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन श्री परजणे यांनी संघाच्या कार्यस्थळावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेतून केले.
प्रारंभी कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय सुरेशराव रासकर दादा यांना गोदावरी दूध संघाच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.