ब्रेकिंग

गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय परिसर चैतन्याने भरून गेला होता. शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी आपली जीवनशैली योगमय करून नियमित योग साधना केली पाहिजे. आपले शरीर आणि मन सुंदर घडवायचे असेल, तर प्रत्येकाने दिवसाची सुरवात योग साधनेने करावी असे आवाहन केले. 

मैदानी खेळात वर्चस्व असलेल्या गौतम पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना नियमितपणे मैदानावर विविध खेळाचे गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये नियमित व्यायामाचा सराव व योग साधना देखील विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाते. त्याचा सकारात्मक परीणाम विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर होतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय योग दिन हा  विद्यार्थ्यांना  योगाभ्यासाद्वारे शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण होता. उल्लेखनीय बाब म्हणजे, शिक्षकांनी उत्साहाने विद्यार्थ्यांसोबत विविध योगासने करण्यात सहभाग घेतला. त्यामुळे एक सुसंवादी आणि फलदायी वातावरण निर्माण झाले होते. एकूण १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.  संस्थेचे चेअरमन मा.आ. अशोकराव काळे, विश्वस्त आ. आशुतोष काळे, व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, सचिव सौ. चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य यांनी शाळेची वाढती विद्यार्थी संख्या व भव्य योग दिन साजरा केल्या बद्दल प्राचार्य व क्रीडा विभाग यांचे कौतुक केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!