तुषार ढेपले यांची मुंबई महानगरपालिकेत उप अभियंता पदावर नेमणूक
शिक्षक कुटुंबाचा गौरवशाली क्षण

तुषार ढेपले यांची मुंबई महानगरपालिकेत उप अभियंता पदावर नेमणूक
तुषार ढेपले यांची मुंबई महानगरपालिकेत उप अभियंता पदावर नेमणूक
शिक्षक कुटुंबाचा गौरवशाली क्षण
कोपरगाव । प्रतिनिधी । संवत्सर (ता. कोपरगाव) येथील सुपुत्र चि. तुषार (सनी) सुनील ढेपले यांची नुकतीच मुंबई महानगरपालिका येथे स्थापत्य उप अभियंता (वर्ग २) या पदावर नेमणूक झाली असून त्यांनी NTC प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावत हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे ढेपले कुटुंबासह संपूर्ण कोपरगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
तुषार ढेपले हे स्वर्गीय कारभारी म्हातारबा ढेपले गुरुजी यांचे नातू असून त्यांचे वडील आदरणीय सुनील कारभारी ढेपले सर हे जिल्हा परिषद शाळा, तळेगाव मळे येथील मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तुषार यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, संवत्सर येथे इयत्ता पहिली ते चौथी पूर्ण झाले. पुढे त्यांनी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई. (सिव्हिल) ही पदवी घेतली.
विशेष म्हणजे तुषारने कोणत्याही क्लासशिवाय, स्वतःच्या मेहनतीने व अभ्यासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. जिद्द, सातत्य, आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर त्यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून दाखवले. त्यांच्या यशाने शिक्षक परिवारात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे.या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा कोपरगाव यांच्या वतीने चि. तुषार ढेपले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कोपरगाव तालुक्यातील अनेक शिक्षक बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी ढेपले कुटुंबाच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची आठवण काढून तुषार याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.ढेपले कुटुंबाने शिक्षक समाजासाठी जे कार्य केले आहे, त्याचा हा गौरवमयी क्षण आहे. तुषार यांच्याकडून भविष्यात गोरगरिबांसाठी कार्य व्हावे, अशी साई चरणी प्रार्थना करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सदस्य सचिव चांगदेवराव ढेपले,जिल्हा सरचिटणीस अशोक राव कानडे,जिल्हा संपर्क प्रमुख दिपकजी झावरे,जिल्हा उच्चाधिकारचे उपाध्यक्ष विजयराव सोंजे,जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र पोटे,कोपरगाव तालुका शिक्षक नेते मुरलीधर वाकचौरे,संजयजी खरात, कैलासजी वाघ,कोपरगाव तालुकाध्यक्ष वाल्मिक खंडीझोड,संजयजी दहिफळे,प्रभाकर गायकवाड,लक्ष्मीकांत वाडीले , लतिफ पठाण,महेंद्र गोसावी,योगेश मोरे,अमोल थिटे, नवनाथ सूर्यवंशी, अमोद माळी, काळू मुठे,नितीन अडांगळे,अनुज ढुमणे,अशोक शिंदे, ज्ञानेश्वर सैंदाने,अशोक शिरसाट,अशोक गोपाळ,पाटील पितांबर,मच्छिंद्र खैरे या सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या.तसेच केंद्रप्रमुख श्री राजेंद्र ढेपले व चांगदेवराव ढेपले हेही उपस्थित होते.