नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच राहू – आ. आशुतोष काळे
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न

नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच राहू – आ. आशुतोष काळे
नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच राहू – आ. आशुतोष काळे
कर्मवीर शंकरराव काळे कारखाना व उद्योग समुहातील कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम संपन्न
कोपरगांव । प्रतिनिधी । कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी शेतकऱ्यांचे हित जोपासून कर्मचाऱ्यांना देखील त्यांच्या घामाचा योग्य मोबदला दिला. त्यांना अपेक्षित असलेला कारखान्याचा कार्यभार आपले मार्गदर्शक मा.आ. अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे सुरु आहे. आजवरच्या कारखाना आणि उद्योग समूहाच्या जडणघडणीत काळे परीवाराच्या सुख-दु:खात आपले सर्वांचे योगदान हे कुटुंबातील सदस्याप्रमाणे होते. त्यामुळे ज्याप्रमाणे आजवर कुटुंबाचे सदस्य म्हणून आपण राहिलो तसेच यापुढील काळातही नेहमीच कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच राहू. तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कधीही हाक मारा मी तुमच्यासाठी हजर आहे अशी ग्वाही शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी दिली.
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व आसवनी विभागातील सेवा निवृत्त होणाऱ्या ५० कर्मचा-यांच्या सेवा निवृत्तीनिमित्त निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी सेवेत असतांना जीव ओतून काम केले. सेवेत असल्यामुळे कुटुंबाला वेळ देता आला नसेल व आवडते छंद देखील जोपासता आले नसेल. परंतु आता तुमचा दिनक्रम बदलला आहे. आजवर अधुरे राहिलेले स्वप्न पूर्ण अवश्य करा परंतु सर्वात महत्वाचे आपल्या आरोग्याची काळजी घ्या असा भावनिक सल्ला दिला.आजवरच्या राजकीय निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांप्रमाणे आपण सर्वांनीच चांगले काम केल्यामुळे काही अपवाद वगळता राजकीय निवडणुकीत यश मिळाले त्या माध्यमातून कोपरगाव मतदार संघाचा विकास करू शकलो. २०२४ च्या निवडणुकीत देखील कार्यकर्त्यांबरोबरच सर्वच कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे जिल्ह्यात ऐतिहासिक विजय मिळाला त्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी आभार मानले. या प्रसंगी कारखान्याचे मार्गदर्शक ज्येष्ठ संचालक मा.आ.अशोकराव काळे, व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक सुधाकर रोहोम, दिलीपराव बोरनारे, वसंतराव आभाळे, श्रीराम राजेभोसले,सचिन चांदगुडे, अनिल कदम, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, दिनार कुदळे, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, डॉ.मच्छिंद्र बर्डे, प्रशांत घुले, श्रावण आसने, गंगाधर औताडे, विष्णू शिंदे यांचेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे तसेच विविध खात्यांचे प्रमुख पदाधिकारी यांचेसह निवृत्त कर्मचारी आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परीवारातील सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी निवृत्त कर्मचारी व त्यांचे परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक व स्वागत सेक्रेटरी बाबासाहेब सय्यद यांनी केले.सूत्रसंचालन डेप्यु. सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांनी केले तर आभार व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण यांनी मानले.