अलोट गर्दी व मान्यवरांच्या उपस्थितीने जन्मशताब्दी महोत्सव ठरला संस्मरणीय
अलोट गर्दी व मान्यवरांच्या उपस्थितीने जन्मशताब्दी महोत्सव ठरला संस्मरणीय
संगमनेर । विनोद जवरे ।
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमांसाठी राज्यभरातून आलेल्या मान्यवरांसह प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी तरुण, महिला व आबाल वृद्धांसह बालगोपाळांची मोठी उपस्थिती, शिस्तबद्ध व दर्जेदार कार्यक्रम यामुळे हा जयंती महोत्सव संस्मरणीय ठरला आहे.
जाणता राजा मैदानावर चार दिवस झालेल्या या कार्यक्रमासाठी 60 बाय 60 चे भव्य दिव्य स्टेज ,जर्मन हंगर पद्धतीचा अद्यावत मंडप, साउंड सिस्टिम, एलईडी स्क्रीन, डिजिटल प्रणाली, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, प्रशस्त पार्किंग, स्वर्गीय भाऊसाहेब थोरात अण्णासाहेब शिंदे यांच्या जीवन कार्यावरील फोटो गॅलरी ,आकर्षक सजावट, यामुळे हे मैदान खुलून गेले होते. आठ दिवस अगोदर या कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती.
पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी सुमारे पंचवीस हजार नागरिकांची उपस्थिती हे मोठे वैशिष्ट्य ठरले. यामध्ये महिलांची व तरुणांची उपस्थिती मोठी होती. यावेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री नामदार सिद्धरामय्या, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला, कर्नाटकचे मंत्री एच के पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे नेते आमदार भास्करराव जाधव, यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ गांधीवादी नेते उल्हास दादा पवार यांना स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले तर कृषी क्षेत्रातील योगदानाबद्दल जळगावच्या जैन उद्योग समूहाला डॉ.अण्णासाहेब शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचवेळी सहकार क्षेत्रातील नेतृत्व म्हणून कोल्हापूरचे आमदार पी एन पाटील यांना गौरवले गेले.
यावेळी असलेली उपस्थिती झालेले नियोजन आणि शिस्तबद्ध कार्यक्रम याची कौतुक कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री नामदार सिद्धरामय्या तसेच पृथ्वीराज चव्हाण, भास्करराव जाधव व जितेंद्र आव्हाड यांनी केले. या भव्य दिव्य स्टेजवर स्थानिक कलाकारांना संधी मिळावी याकरता स्थानिक कलावंत व विद्यार्थ्यांनी सादर केलेला आनंद सोहळा या कार्यक्रमाने ही धमाल केली. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून एकविरा फाउंडेशन ने आयोजित केलेल्या होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर यांच्या खेळ मांडीयेला या कार्यक्रमाला तालुक्यातील सुमारे दहा हजार महिलांनी उपस्थिती लावली यावेळी फुगडी डान्स विविध खेळ यामध्ये महिला भगिनी रंगून गेल्या हा कार्यक्रम महिलांसाठी अविस्मरणीय ठरला. तर तरुणाईच्या आग्रहास्तव झालेला बॉलीवूडमधील आघाडीचा गायक जावेद आली याचा लाईव्ह कॉन्सर्ट हा संस्मरणीय ठरला यामध्ये तरुणांची उपस्थिती , सहभाग सामूहिक नृत्य आणि बॉलीवूडच्या गीताने एकच जल्लोष केला. प्रत्येक गाण्यावर तरुणाईने ठेका धरला.
तर प्रेरणा दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावर तालुक्यातील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या बापू तेरे रास्ते या भावगीतांनी सर्वांना भक्तीरसात चिंब करून टाकले यावेळी भावनिक भाषणांनी अनेकांच्या डोळ्यात अश्रू तराळाले.सर्व कार्यक्रमांचे काटेकोर नियोजन, राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातून मान्यवरांची असलेली मोठी उपस्थिती, राज्यातील विविध पक्षांचे माजी मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार, काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी यांची मोठी लक्षणीय उपस्थिती होती. सर्वांचे स्वागत आपुलकी यामुळे उपस्थित सर्वजण भारावले. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माध्यमांचे प्रतिनिधी ,साहित्य, कला,क्रीडा या क्षेत्रातील प्रतिनिधी या सर्वांच्या उपस्थितीने हा सोहळा संस्मरणीय ठरला. हे सर्व कार्यक्रम थेट प्रक्षेपित होत असल्याने राज्यभरासह अमेरिका इंग्लंड ऑस्ट्रेलिया यामधूनही अनेकांनी या कार्यक्रमात सहभागी होत आनंद घेतला.
आदरतिथ्थने सर्वजण भारावलेप्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी मोठी गर्दी असूनही प्रत्येकाचे केले जाणारे स्वागत , आस्थेवाईकपणे चौकशी. यामुळे प्रत्येक जण भारावला. काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, यांचेसह कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी प्रत्येक महिला भगिनी यांच्याजवळ भेट घेतली . थोरात तांबे परिवार आणि अमृत उद्योग समूहाच्या पदाधिकाऱ्यांकडून मिळालेली सन्मानाच्या वागणुकीने प्रत्येक जण भारावला.