बहादरबाद जि.प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांनी घेतला बाल आनंद मेळाव्याचा आनंद
बहादरबाद जि.प. शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
कोपरगांव । विनोद जवरे ।
आज दिनांक 11 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बहादराबाद येथे बाल आनंद मेळावा ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी वडापाव ,इडली सांबर ,पाणीपुरी, ओली भेळ ,सँडविच अशा खाद्यपदार्थांचे तसेच पेरू ,बोर ,चिंचा अशा फळांचे स्टॉल लावलेले होते .त्याचप्रमाणे भाज्यांचेही स्टॉल लावलेले होते.
यावेळी पालक व ग्रामस्थ यांनी सदरच्या बालआनंद मेळाव्याला भेट देत विद्यार्थ्याकडून खाद्यपदार्थांची खरेदी करत त्यांचा आनंद द्विगुणीत केला.यावेळी ग्रामपंचायत तथा व्यवस्थापन समिती सदस्य कु आरती पाचोरे हिच्या वाढदिवसानिमित्त तिचा सन्मान करण्यात आला.यावेळी बहादराबाद च्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच अश्विनी पाचोरे, माजी सरपंच विक्रम पाचोरे, उपसरपंच गिताराम पाचोरे,चेअरमन साहेबराव पाचोरे, काकासाहेब पाचोरे संदीप पाचोरे, मयूर पाचोरे, कल्याणी पाचोरे,सोमनाथ पाचोरे,निलेश पाचोरे, वैभव पाचोरे, वाल्मीक पाचोरे ,सुशीला पाचोरे ,कुसुम पाचोरे ,चंद्रकला पाचोरे मैनाबाई माळी, शितल सरवार, अर्जुन पाचोरे, अनिल डुबे, उमेश गिरी ,निशा पाचोरे,लिलाबाई पाचोरे, डॉ.बाजीराव पाचोरे,रत्नाबाई डुबे, अशाबाई मोरे, मालती पाचोरे, अर्चना पाचोरे ,कुसुमबाई पाचोरे,आरती पाचोरे यांसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्रीम स्वाती गुळवे मॅडम ,श्री- सचिन तारडे सर व श्रीमती चंद्रकला पाचोरे यांनी परिश्रम घेतले