खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंञीपदे बहाल केली – खासदार संदिपान भुमरे
केवळ ऑनलाईन दिसणाऱ्या मुख्यमंञ्यांच्या विरोधात उठाव केला म्हणूनच जनतेला न्याय देता आला!

खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंञीपदे बहाल केली – खासदार संदिपान भुमरे
खोके – बोक्यांचा आरोप करणाऱ्यांनीच खोके घेवून मंञीपदे बहाल केली – खासदार संदिपान भुमरे
केवळ ऑनलाईन दिसणाऱ्या मुख्यमंञ्यांच्या विरोधात उठाव केला म्हणूनच जनतेला न्याय देता आला!
नेवासा । प्रतिनिधी । आमचे पहीले मुख्यमंञी केवळ ऑनलाईन दिसत होते त्यामुळे आम्हाला उठाव करावा लागला आमच्यावर खोके – बोकेंचा आरोपही झाला आम्ही माञ शिवसेनेशी प्रामाणिक राहून हातात झेंडे धरले केसेस अंगावर घेतल्या आणि सत्ता आल्यावर आम्हाला चांगले मंञी पद देण्यापेक्षा खोके बहाद्दरांना दिले गेले अशी खोचक टिका छञपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे यांनी उबाठा सेनेचे माजी मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्यावर शिरसगांव (ता.नेवासा) येथे करत चांगलाच हल्लाबोल केला.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,त्यावेळचे ऑनलाईन दिसणाऱ्या मुख्यमंञ्यांनी कधी आमच्याशी बोललेच नाही त्यामुळे आम्हाला हा उठाव करवा लागला आणि आमचा उठाव हा जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्कारणी लागला असल्याचे खासदार संदिपान भुमरे यांनी यावेळी सांगून मला मिळालेल्या मंञीपदाचे सोने करत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचे आत्मिक समाधान लाभल्याचे गौरोद्गगार खासदार संदिपान भुमरे यांनी शिरसगांव (ता.नेवासा) येथे बुधवार (दि.२) रोजी नेवासा विधानसभा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या आयोजित अभिष्ठचिंतन सोहळ्याप्रसंगी बोलतांना केले.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार डॉ.सुजय विखे – पाटील,माजी आमदार पांडूरंग अभंग,पंचगंगा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा प्रभाकर (काका) शिंदे,काशिनाथ नवले, सिद्धांत नवले – पाटील,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार,किसनराव गडाख,भाजपाचे नेते सचिन देसरडा, ऋषीकेश शेटे,दत्तु नाना पोटे,हरिभाऊ लंघे,डॉ.तेजेश्री लंघे,शंकरराव लोखंडे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश डिके,अंकुशराव काळे,राजेंद्र पोटे, अशोकराव मिसाळ,सुनिलराव वाघमारे,ज्ञानेश्वर पेचे, ञिमुर्ती शैक्षणिक संकुलाच्या उपाध्यक्ष अॅड.स्नेहल चव्हाण – घाडगेपाटील,दादा विधाटे प्रताप चिंधे,भाऊसाहेब वाघ यांच्यासह विविध सामाजिक,धार्मिक आणि राजकिय क्षेञातील विविध मान्यवर यावेळी व्यासपिठावर प्रभृती उपस्थित होते. यावेळी बोलतांना खासदार संदिपान भुमरे पुढे म्हणाले की,माझ्या सारख्या सर्वसामान्य मानसाला शिवसेनेचे सर्वेसर्वा राज्याचे उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी मोठे केले असून आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या मागे तर विखे कुटूंबियांची भक्कम साथ असल्यामुळे त्यांना लवकरच लाल दिवाही मिळू शकतो? असा आशावाद आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांच्या अभिष्ठचिंतन सोहळ्यीप्रसंगी खासदार भुमरे यांनी व्यक्त केल्यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात मोठी दाद दिली.यावेळी बोलतांना डॉ.सुजय विखे – पाटील म्हणाले की, आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांना वेळोवेळी मोठी राजकीय संधी आलेली असतांनाही त्यांनी ‘ती’ सोडून दिल्यामुळे दुसऱ्यांनीच या संधीचा लाभ उठवत या तालुक्याचे आमदार झाले या विधानसभा निवडणूकीमध्ये आमदार विठ्ठलराव लंघे – पाटलांना मिळालेल्या संधीत या निवडणूकीत काहींनी मदत करण्यापेक्षा त्यांना पाडण्यासाठी सुपारी घेवून रिंगणात उतरले ? अशी टिका अप्रत्यक्षपणे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यावर केली माञ सर्वसामान्य जनतेने विठ्ठलराव लंघे – पाटील यांना आमदार केल्याचे डॉ.सुजय विखे – पाटील यांनी सांगून ते पुढे म्हणाले की, छञपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील हे असे दोन उदाहरणे राज्यात आहेत की,सर्वसामान्य माणूसही आमदार – खासदार होवू शकतो? असे सांगून डॉ.सुजय विखे – पाटील म्हणाले की,आमदार विठ्ठलराव लंघे सारखा माणूस राज्यात शोधूनही सापडणार नाही सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडलेली असून ४५ वर्षानंतर आपल्या गावातील आपल्या आमदाराचा सत्कार करण्याचा योग थेट ४० वर्षानंतरच्या अविष्मरणीय राजकीय प्रवासातून शिरसगांवकरांना आल्यामुळे या अभिष्ठचितंन सोहळ्याला विशेष महत्व असल्याचे गौरोद्गारही यावेळी डॉ.सुजय विखे – पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील बोलतांना म्हणाले की,माझ्या स्वभावात कधीही बदल होणार नाही,सर्वसामान्य जनतेने आणि माझ्या लाडक्या बहिनींमुळे मला ही संधी मिळालेली असून या संधीचे ‘मी’ सोने करुन जनसामान्यांच्या प्रश्नासाठी सदैव तत्पर राहील,अशी ग्वाही यावेळी आमदार लंघे – पाटील यांनी देत ते पुढे म्हणाले की, ‘मी’तुमच्या सारखाच सर्वसामान्य माणूस असून तुम्ही मला कधीही भेटू शकता, पहील्या आमदारांना भेटण्यासाठी सात पडदे ओलांडून जावे लागत होते आता मला भेटण्यासाठी अशी गरज भासणार नाही मला आपण कुठेही भेटू शकता असे सांगून ते म्हणाले की,शैनेश्वर देवस्थानचा अॅप घोटाळ्याबाबत आपण विधानसभेत आवाज उठविणार असून घोटाळेबाज लोकांसह मास्टरमाईंडचे काळे बुरखे फाडणार असल्याची रोखठोक भूमिकाही यावेळी त्यांनी स्पष्ट केली या अभिष्ठचितंन सोहळ्याप्रसंगी तालुक्यातील महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवारी सकाळी १० वाजता नेवासा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन राज्याचे माजी मंञी छञपती संभाजीनगरचे शिवसेनेचे खासदार संदिपान भुमरे आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे – पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर शिरसगांव येथील अभिष्ठचिंतन सोहळा पार पडला.