प्रत्येक जिवाच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सद्गुरुंची पौर्णिमा म्हणजेच आत्मा मालिक गुरुपौर्णिमा – संत परमानंद महाराज
देश विदेशातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार गुरुपौर्णिमा महोत्सव

प्रत्येक जिवाच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सद्गुरुंची पौर्णिमा म्हणजेच आत्मा मालिक गुरुपौर्णिमा – संत परमानंद महाराज
प्रत्येक जिवाच्या हृदयात विराजमान असणाऱ्या सद्गुरुंची पौर्णिमा म्हणजेच आत्मा मालिक गुरुपौर्णिमा – संत परमानंद महाराज

देश विदेशातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये साजरा होणार गुरुपौर्णिमा महोत्सव
कोपरगाव । प्रतिनिधी । प्रत्येकाच्या हृदयामध्ये अखिल विश्वाचा सदगुरु म्हणजेच निर्गुण परमात्मा निवास करत आहे. अशा या विश्वात्मक गुरुदेवाचा महोत्सव म्हणजे प्रत्येकाचा आत्मोत्सव आहे. म्हणून प.पु. गुरुदेव आत्मा मालिक माऊलींच्या कृपाशिर्वादाने आत्मसाधना करणारा प्रत्येक भक्त या वार्षीक सोहळयासाठी राज्यासह इतर राज्यातूनच नव्हे तर अनेक विदेशातूनही उपस्थीत असतात.या सोहळयाचा प्रारंभ दि. ८ जुलै रोजी पहाटे ४.३० वा आश्रमातील मुख्य मंदीरात श्री आत्मस्वरुप सद्गुरुंच्या पादुकांचा अभिषेक तसेच ध्वजपुजन, काकड आरती करुन होणार आहे.
दिनांक ८,९ व १० जुलै दरम्यान चालणाऱ्या या गुरुपौर्णिमेच्या महोत्सवासाठी विविध सत्संग मंडळे, गावोगावची भजनी मंडळे, विविध प्रवचनकार, किर्तनकार आपली सेवा देणार आहेत. दैनंदिन काकड आरती, हरिपाठ, आदी कार्यक्रम अखंडपणे चालणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत आत्मा मालिक ध्यानपीठाचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी दिली. सालाबाद प्रमाणे हजारो भाविकांनी ४५ दिवसांचे आत्मानुष्ठाण पूर्ण करत तनमनाच्या शुध्दी करणासहित आपल्याच अंतर्यामी अत्मस्वरुपाचे संशोधन करण्यासाठी पाण्यावर उपवास करुन अनुष्ठाण विधी संत शांतीमाई यांचे करकमलाव्दारे संपन्न केल्याची माहिती ध्यानपीठाचे उपध्यक्ष संत निजानंद महाराज, श्रीमती कमलताई पिचड, सौ. सुरेखाताई मोहिते पा. यांनी दिली. सदर उत्सवासाठी ५० हजार स्क्वेअर फु. सत्संग मंडप, दर्शन रांगेची व्यवस्था, संपूर्ण आश्रम परिसरात विद्युत रोषणाई तसेच हा संपूर्ण सोहळा संपन्न करणसाठी विविध प्रकारच्या २१ समिती संत पीठाच्या अधिन्स सेवा देणार असल्याची माहिती ध्यानपीठाचे सचिव संत विश्वानंद महाराज यांनी दिली.

गुरुकार्यातील परंपरेप्रमाणे विविध सत्संग मंडळानी भिक्षाफेरी करुन अखंड चालणाऱ्या अन्नछत्रासाठी प्रसादालय विभागामध्ये अन्नधान्याच्या राशी अर्पण केल्याचे प्रसादालय प्रमुख तथा उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गोरडे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, संत चांगदेव महाराज व प्रभावती माई यांनी माहिती दिली. महोत्सवादरम्यान पंचपक्वान्नसहीत विविध पदार्थांचा समावेश असणारा विशाल महाप्रसाद अखंड २४ तास वितरीत केला जाणार आहे. तसेच या उत्सव काळात चौदसच्या दिवशी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांरिता ५१ पोते बुंदीचा महाप्रसाद वितरीत केला जाणार असल्याची माहिती श्री. प्रकाश भट, श्री. प्रकाश गिरमे, श्री. आबासाहेब थोरात, श्री. विठ्ठलराव होन, श्री. प्रभाकर जमधाडे, श्री. वसंतराव आव्हाड यांनी दिली.या महाप्रसाद वितरणासाठी महाराष्ट्रातील विविध संत्सग मंडळासह विशेष सौराष्ट्रहून गुजरात अन्न छत्राची सेवा करण्यासाठी २०० भाविक उपस्थित राहणार असल्याचे सुरतचे संत कृष्णानंद महाराज व श्री. जाधवभाई पावसीया यांनी सांगीतले.उत्सवासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची विस्तृत निवास व्यवस्था सेवेसाठी सज्ज असल्याची माहिती संत गणूदास महाराज व प्रदीप भंडारी, श्रीधर गायकवाड यांनी दिली.या वार्षीक महोत्सवाचे औचित्य साधुन आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील हजारो विदयार्थ्यांनी आपल्या मुख्यध्यापक व वर्ग शिक्षकासह प.पू. सदगुरुचे पुजन करुन आशिर्वाद घेतले.या सर्व विदयार्थ्यांचे पालक वृंद देखील महोत्सवास सहभागी होवून सदगुरुंच्या दिव्य दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेणार असल्याचे माहिती विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष श्री. नंदकुमार सुर्यवंशी साहेब यांनी दिली.
आश्रमाच्या विविध शाखांचे सकल संत व संत माता स्थानिक व्यवस्थान समितीच्या पदाधिकाऱ्यासह विविध संत्सग मंडळे अनेक भाविक भक्तांनी तनमन धन अर्पण करुन या सत्कार्यास हातभार लावल्याची माहिती आत्मा मालिक ध्यानपीठाचे कोषाध्यक्ष संत विवेकानंद महाराज, श्री. विठठलराव होन, श्री. भगवानराव दौंड, श्री. जाधवभाई पावसीईया, श्री. विष्णुपंत पवार, श्री. मोहनराव शैलार, श्री. उमेश जाधव, श्री. विलास पाटील यांच्यासह आदिनीं माहिती दिली.अशा या वैश्विीक गुरुपोर्णीमा सोहळयाचे सर्वांना जाहिर आमंत्रण ध्यानपीठाचे विश्वस्त संत चंद्रानंद महाराज, संत आत्मानंद महाराज, श्री. भगवानराव दौंड यांनी दिले. हा संपूर्ण गुरुपोर्णीमा उत्सव सोहळा ऑन लाईन पध्दतीने प्रसारीत केला जाणार असल्याची माहिती श्री. प्रकाश मेहता, श्री. उदय शिंदे यांनी दिली. या सोहळयास कोकमठाण ग्रामस्थांसह विविध गावातील संत्सग मंडळे सेवा देणार असल्याची माहिती आत्मा मालिक ध्यानपीठाच्या वतीने देण्यात आली.