ब्रेकिंग

संगमनेरवासियांकडून मोठ्या उत्साहात प्रवरेचे पाणी पूजन व आरती

मा.आ.डॉ.सुधीर तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांची उपस्थिती

संगमनेरवासियांकडून मोठ्या उत्साहात प्रवरेचे पाणी पूजन व आरती

संगमनेरवासियांकडून मोठ्या उत्साहात प्रवरेचे पाणी पूजन व आरती
जाहिरात मो-7756045359
मा.आ.डॉ.सुधीर तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांची उपस्थिती
संगमनेर । प्रतिनिधी । भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने प्रवरा, आढळा व म्हाळुंकी नद्यांना पूर आले असून प्रवरा नदी दुधडी भरून वाहू लागली आहे. प्रवरेतून आलेल्या पहिल्या पाण्याचे संगमनेर शहरवासीयांनी मा. आ. डॉ सुधीर तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने पूजन करत आरती केली.

प्रवरानदीतीरावर गंगामाई घाटावर येथे प्रवारा नदीचे जल पूजन व आरती करण्यात आली. याचबरोबर म्हाळुंगी नदीला साडी चोळी अर्पण करण्यात आली. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात,डॉ.मैथिलीताई तांबे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, गणेश मादास, अंबादास आडेप, लक्ष्मण बर्गे, ॲड अजित काकडे, सौ.प्रमिला अभंग, ॲड मुन्ना कडलक, चंद्रकांत कडलक, बाळासाहेब पवार, शैलेश कलंत्री, सुमित पवार,आदित्य बर्गे,चंद्रकांत काळन, एकनाथ श्रीपत, सौ.प्रीती फटांगरे,मिलिंद आवटी, आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी मोठ्या उत्साहाने सर्वांनी प्रवारा नदीचे जलपूजन करून या ठिकाणी आरती केली. याचबरोबर सर्व महिलांनी विधिवत पूजा करून प्रवरा नदीला दिवे अर्पण केले.

यावेळी बोलताना डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, प्रवरा नदीमुळे उत्तर नगर जिल्ह्यातील नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे.भारतीय संस्कृतीमध्ये नदीला अत्यंत पवित्र स्थान आहे. नदीला आई म्हटलेले आहे.यावर्षी सुरुवातीलाच पाऊस चांगला झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.भंडारदरा धरणाबरोबर प्रवरा नदीवर निळवंडे येथे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मोठ्या प्रयत्नातून निळवंडे धरण पूर्ण केले. दोन्ही बाजूला कालवे निर्माण केले. नदीतून आणि कालव्यातून पाणी येत असल्याने आता समृद्धी वाढली आहे. निळवंडे व भंडारदरा मिळून आता 20 टीएमसी पाणी उपलब्ध होत आहे. या पाण्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाला आहे. नदी सर्वांना सामावून सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करते. संगमनेरला शहरातील नागरिकांसाठी प्रवरा नदीतील दुथडी भरलेले पाणी पाहणे हा अत्यंत आनंददायी क्षण असल्याचे ते म्हणाले.तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, रतनवाडी येथील अमृतेश्वर पासून उगम पावणारी आपली प्रवरा नदी ही पुढे मोठी होत जाऊन समुद्राला मिळते. पाच नद्यांच्या संगमामुळे संगमनेर शहराला संगमनेर हे नाव मिळाले आहे.संगमनेर ची एक सुसंस्कृत संस्कृती आहे. आणि या संस्कृतीचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. प्रत्येक विभागाची संस्कृती घेऊन प्रवरा नदी समुद्राशी एकरूप होते. संगमनेरची ही संस्कृती एकतेची समानतेची आहे. आई म्हणून नदीची ओळख असून मोठ्या आनंदाने दरवर्षी आपण तिचे पूजन करत असतो.आजचा हा क्षण संगमनेरातील नागरिकांसाठी मोठा आनंदाचे असल्याचे त्या म्हणाल्या.तर सोमेश्वर दिवटे म्हणाले की, संगमनेर शहराचे विकास कामे शहरासाठी थेट पाईपलाईन गंगामाई घाटाची सुशोभीकरणासह विविध कामे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण केल्यामुळे संगमनेर हे वैभवशाली शहर निर्माण झाले आहे.याप्रसंगी अनिता कानवडे, अंजली बेल्हेकर, संगीता सातपुत,दगाबाई धात्रक,उषा शाह,संगीता थोरात, मीना पटेल,वैशाली आडेप,नम्रता आडेप, कांचन गुप्ता, स.सुनीता कांदळकर,सुषमा भालेराव, सौदामिनी कान्होरे,अन्नपूर्णा पवार, माया भालेराव, वैष्णवी आडेप,शितल कानवडे,सुमन वामने, बेबीताई मांजरे, कांचन घोडेकर, मीना घोडेकर, वैशाली घोडेकर, यांच्यासह साईनगर घोडेकर मळा चव्हाण पुरा लाल तारा काटे मळा माधव टॉकीज रंगार गल्ली कॉलनी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.यावेळी संगमनेर मधील विविध पक्षांचे कार्यकर्ते नागरिक पदाधिकारी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!