ब्रेकिंग

अंजनापुर येथील भागवत कथेची मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थित सांगता

अंजनापुर येथील भागवत कथेची मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थित सांगता

अंजनापुर येथील भागवत कथेची मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थित सांगता

कोपरगाव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे गेल्या ७ दिवसापासून श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी समाधीस्थान बेट कोपरगावचे मठाधीपती महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने लोकनेते मारुतीराव सखाराम गव्हाणे व बिजलाबाई गव्हाणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित श्रीमद् भागवत कथेची हजारो भाविक भक्तांच्या उपस्थित मोठ्या जल्लोषात सांगता झाली


हभप परमपूज्य देव गोपाल शास्त्री महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून बुधवार दि ७ मे २०२५ पासून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेची सांगता बुधवार दिनांक १४ मे रोजी गोदावरी धाम सरला बेट चे मठाधिपती पपु महंत हभप रामगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने व हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत सर्वांना महाप्रसादाचे वाटप करत मोठ्या भक्ती भावाने संपन्न झाली.

गेल्या ७ दिवसापासून सुरू असलेल्या भागवत कथेस गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास कोते, भाजपा तालुका अध्यक्ष कैलास राहाणे, सिने अभिनेते हंसराज जगताप, शिर्डीचे माजी नगरसेवक तुषार गोंदकर, माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राहाणे आदींनी भेटी दिल्या तर अखेरच्या दिवशी मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन औताडे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शिरिष व वमने, कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, हभप शिवशाहीर विजय महाराज तनपुरे, अभिनेते सचिन गवळी, हभप मयूर महाराज पाचोरे, हभप चांगदेव महाराज ढेपे, हभप बबन महाराज गाडेकर, हभप भास्कर महाराज गव्हाणे आदी संत महंतासह परिसरातील अनेक सरपंच,उपसरपंच, विविध संस्थेचे पदाधिकारी, महिला, पुरुष,युवक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या प्रसंगी रामगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना उपदेश करताना सांगितले की, भक्ती हा परा कोटीचा मार्ग आहे ईश्वरीय साधना मनुष्याला मुक्तीचा मार्ग दाखवते हे प्रत्येकाला समजत असूनही त्याची आवड निर्माण होत नाही त्यामुळे कलयुगात मनुष्याला दिवसेंदिवस समस्या वाढत आहे त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक कार्यात जास्तीत जास्त सहभाग नोंदवत परमात्म्याचे नामस्मरण करावे कारण परमात्मा सदैव आपल्याला येणाऱ्या समस्या अडचणी सोडवण्यासाठी तयार असतो त्याकरता मनोभावे देवाची प्रार्थना करणे आवश्यक असल्याचे सांगत भागवत कथा श्रवण करणाऱ्या सेवकांचे शास्त्रीय नियमाचे विवेचन सांगत भागवताची निर्मिती कशी झाली तसेच या कलियुगात मोक्ष प्राप्ती करण्याचा सोपा मार्ग भागवत कथा असल्याचे सांगत नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अंजनापूरचे सुपुत्र आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे व त्यांच्या कुटुंबाने आपल्या पूर्वजांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमाचे स्वागत करत गव्हाणे कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.


तर याप्रसंगी आयोजक आरोग्यदुत बाळासाहेब गव्हाणे यांनी सांगितले की, आजी-आजोबांच्या पुण्यस्मरणनिमित्त इतर काही खर्च करण्यापेक्षा सर्वांच्या सहमतीने भागवत कथेचे आयोजन केले.गेल्या ७ दिवस अखंड सुरू असलेल्या या भागवत कथेस मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहिले या सर्वांना आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने दररोज अन्नदान करण्याची सेवा मिळाली तसेच गेल्या दोन दिवसापासून कमी अधिक प्रमाणात अवकाळी पाऊस सुरू असताना देखील कथेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांची कुठे कमी जाणवली नाही दररोज आपल्याच गर्दीचा उच्चांक मोडत भागवत कथा आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वी संपन्न झाली याबद्दल मी गव्हाणे परिवाराच्या वतीने समस्त अंजनापुर पंचक्रोशीतील महिला पुरुष युवकांचे आभार व्यक्त करतो व माझ्या हातून अशीच देव देश धर्म ची सेवा करण्यासाठी मला बळ मिळावे हे आशीर्वाद आपणाकडे मागतो

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!