ब्रेकिंग

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत विदयार्थींनी घेतली नायलॉन मांजा विरोधी शप्पथ

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत विदयार्थींनी घेतली नायलॉन मांजा विरोधी शप्पथ

कोपरगांव । प्रतिनिधी ।आज श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय हरित सेने उपक्रमा अंतर्गत घेतली नायलॉन मांजा न वापरण्याची शप्पथ तसेच या बरोबरच पर्यावरण पूरक सुती धागा वापरून निसर्गाचे रक्षण करु असे ठरविले.विद्यालयात अनेक वर्षापासून राष्ट्रीय हरित सेने अंतर्गत पर्यावरण पूरक सण,उत्सव कसे साजरे करावे या बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात येते. त्यातीलच एक भाग म्हणून मानवा प्रमाणेच पक्षी प्राण्यांना सुद्धा घातक ठरलेला नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ विद्यार्थ्यांना या वेळी देण्यात आली.
आज वर्षाच्या सुरुवातीला श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात कला व क्रीडा विभागातील शिक्षकांच्या कल्पनेतून विद्यार्थ्यांकडून फॉर्मेशन प्रकारात २०२५ या आकारात उभे राहून या वर्षात किमान नवीन पंचवीस प्रकल्प शिकण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी सोडला. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश गायकवाड उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे,पर्यवेक्षक अनिल अमृतकर आणि सर्व शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते.

जाहिरात

संस्थेचे अध्यक्ष श्री.कैलास ठोळे,सचिव श्री.दिलीप अजमेरे,स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव श्री. सचिन अजमेरे ,डाॅ.अमोल अजमेरे,सदस्य संदीप अजमेरे,आनंद ठोळे, राजेश ठोळे आदिनी नवीन वर्षाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!