ब्रेकिंग

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काळात विद्यार्थ्यांना थेट मिळाले होते शाळेतच सर्व दाखले

विद्यार्थ्यांना शाळेत दाखले देण्याचा माजीमंत्री थोरात यांचा ऐतिहासिक निर्णय : पालकांची भावना

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या काळात विद्यार्थ्यांना थेट मिळाले होते शाळेतच सर्व दाखले


विद्यार्थ्यांना शाळेत दाखले देण्याचा माजीमंत्री थोरात यांचा ऐतिहासिक निर्णय : पालकांची भावना

संगमनेर ( प्रतिनिधी ) दहावी व बारावीच्या निकालानंतर सर्व विद्यार्थी व पालकांची विविध दाखले काढण्यासाठी सध्या मोठी तारांबळ उडत आहे. यावर प्रभावी उपाययोजना म्हणून काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांना सर्व दाखले शाळेतच देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. सध्या मात्र हे दाखले शाळेत मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांची मोठी पळापळ होत आहे. माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत चांगला होता अशी भावना पालकांमधून उमटत आहे.

जाहिरात

यावर्षी मे महिन्यातच दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असून हे दाखले मिळवण्यासाठी तहसील कार्यालय व इतर ठिकाणी विद्यार्थी व पालकांची मोठी गर्दी आहे. विद्यार्थ्यांना सर्व दाखले शाळेतच मिळावे याकरता तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 2013 मध्ये विद्यार्थ्यांना शाळेतच सर्व दाखले देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यामुळे उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमीलेअर, डोमिसाईल यांसह लागणारे सर्व दाखले शाळेतच मिळत होते यामुळे विद्यार्थ्यांची व पालकांची सर्व गैरसोय टळली होती. 2013 मध्ये 80 लाख दाखले विद्यार्थ्यांना शाळेत दिल्याने या महसूल विभागाच्या निर्णयाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. हा निर्णय अत्यंत चांगला होता. याचबरोबर महाराष्ट्रातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएससी पॅटर्न बरोबर गुणवत्तेत न्याय मिळावा याकरता तत्कालीन शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी बेस्ट ऑफ फाईव्हचा ऐतिहासिक निर्णय घेऊन मराठी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मात्र सरकार बदलले आणि अनेक निर्णय बदलले. सध्या शाळेत दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना विशेषता विद्यार्थिनींना खेडेगावातून येऊन दाखल्यांसाठी दिवस दिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. सध्या अकरावीचे प्रवेश ऑनलाईन झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. सरोवर वेळोवेळी बंद असल्याने ऑनलाईन प्रवेश घेणे अवघड होत आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू नाही. दाखले वेळेत मिळत नाही. अकरावी प्रवेशासाठी धोरण निश्चित नाही. अशावेळी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.पालकांमधून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या हिताकरता राबवलेल्या या निर्णयाची पुन्हा अंमलबजावणी करावी अशी मागणी सर्वत्र होत आहे.

पूर्वीप्रमाणे सर्व दाखले शाळेतच मिळावे – राजेंद्र कहांडळ

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दाखले मिळवण्यासाठी संगमनेरला यावे लागत आहे. येथे येऊन दाखले लवकर मिळत नाही. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात सुरू केलेल्या शाळेत दाखले देण्याचा निर्णय पुन्हा सुरू करावा. राजेंद्र कहांडळ / देवकवठे

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात चांगल्या सुविधा

माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे ग्रामीण भागातील व शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे नेते आहेत त्यांना विद्यार्थ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत म्हणून विद्यार्थी व पालकांसाठी अत्यंत चांगला उपक्रम असलेल्या त्यांनी सुरू केलेल्या सुविधा परत सुरु कराव्या अशी मागणी सौ.ज्योतीताई अण्णासाहेब शेवकर यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!