
वारीत 147 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी !

टेके पाटील ट्रस्टचा उपक्रम : चष्म्यांचे मोफत वाटप
कोपरगाव । प्रतिनिधी । तालुक्यातील वारी येथील दिवंगत ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या स्मरणार्थ राहुल दादा मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने वारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर नुकतेच उत्साहात संपन्न झाले. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव बाजार समितीचे संचालक प्रकाशराव गोर्डे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गोदावरी दूध संघाचे माजी संचालक उत्तमराव माने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल दादा टेके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी उत्तमराव माने, ह.भ.प. विनायक महाराज टेके, डॉ. सर्जेराव महाराज टेके, अशोकराव बोर्डे, अशोकराव कानडे, अँड शरद जोशी, वैष्णवी माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच प्रकाशराव गोर्डे यांनी अध्यक्षीय भाषण केले.

या शिबिराप्रसंगी 147 नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये 15 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया नाशिक येथे करण्यात येणार आहे. तसेच उपस्थित 30 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवर तपासणी करण्यासाठी आलेले नागरिक तसेच मित्र परिवाराला मोफत मदत सेवा केंद्राच्या समन्वयक स्मिता काबरा यांच्यावतीने फराळाचे पाकीट तसेच कान्हेगाव रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर चंद्रभूषण शर्मा यांच्यावतीने दहा डझन केळीचे वाटप करण्यात आले.

यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश कानडे, माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे, डॉ. हर्षल पाठक, डॉ. ऋषिकेश रासने, डॉ. रोहित मीना, कैलास भड, दिलीप गडकरी, तानाजी थोरमिशे, गोरख टेके, कृष्णाराव जाधव, पंडित लकारे, स्मिता काबरा, निर्मला भारूड, विजया बोराडे, प्रणाली देशमुख, रोहिणी लोखंडे, शितल गायकवाड, रोहिणी ठाकरे, सपना रोकडे, वैष्णवी माने, योगेश झाल्टे, विजय ठाकरे, जगन्नाथ मैराळ, नानासाहेब टेके, संजय कवडे, रवींद्र टेके, जयसिंग बनगया, गणेश भाटी, अजीम शेख, राहुल जाधव, आदिनाथ वाडीले, सुरज टेके, स्वप्निल टेके, कृष्णा टेके, शुभम जिरे, आकाश निळे, बाळू दुशिंग, शंकर धामणे, रोहन रोकडे, अमित झाल्टे, सक्षम आवारे, राजवर्धन टेके, जयवर्धन टेके उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी माजी ग्रा.पं. सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.
चार वर्षापासून सातत्यपूर्ण नेत्र तपासणीटेके पाटील ट्रस्टच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून गावात सातत्यपूर्ण मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबविण्यात येत आहे. चार वर्षातील हे सातवे शिबिर होते. आत्तापर्यंत पंधराशे पेक्षा जास्त लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. तसेच 175 पेक्षा जास्त लोकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच गरजूंना व शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले आहे.