ब्रेकिंग

दिवाळीचे लक्ष्‍मीपुजन करताना लक्ष्मी बरोबरच गणेशाची पुजा केली तरच, लक्ष्‍मी घरामध्‍ये विराजमान होईल – पंडीत प्रदीप मिश्रा

शिवपुराण कथेची सांगता लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

दिवाळीचे लक्ष्‍मीपुजन करताना लक्ष्मी बरोबरच गणेशाची पुजा केली तरच, लक्ष्‍मी घरामध्‍ये विराजमान होईल – पंडीत प्रदीप मिश्रा

शिवपुराण कथेची सांगता लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न

राहाता । विनोद जवरे । संसारामध्ये सर्वांच्या भल्याचा विचार करणारी नारी हीच खरी घरची लक्ष्मी असते. “सर्वे भवन्तु सुखी” हाच संदेश तिच्या मातृत्वात असतो. दिवाळीचे लक्ष्‍मीपुजन करताना लक्ष्मी बरोबरच गणेशाची पुजा केली तरच, लक्ष्‍मी घरामध्‍ये विराजमान होईल असा संदेश पंडीत प्रदीप मिश्रा महाराज यांनी शिवपुराण कथेच्या सांगता सोहळ्यात दिला.

जनसेवा फौंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शिवपुराण कथेची सांगता लाखो भाविकांच्या उपस्थितीत “हर हर महादेव आणि शिवसुताय नमोस्तुभ्यम्” या सामुहीक नामघोषान झाली. पहाटे पासूनच भाविकांचा भवसागर शिवनगरीत दाखल झाला होता. सकाळी साडे आठ वाजता पंडीत मिश्रा महाराज यांचे व्यासपीठावर आगमन झाले. प्रारंभी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पंडीतजींचे औपचारीक पूजन करून त्यांना पारंपारीक पगडी आणि डमरू देवून सन्मानित केले.आजपर्यंतच्या झालेल्या शिवपुराण कथेतील सर्वात भव्य आणि सुयोग्य नियोजनाने आयोजित केलेली कथा असा गौरवपूर्ण उल्लेख करून प्रदिप मिश्रा यांनी डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्व गुणांचे कौतुक केले. शिर्डीच्या पावन भूमीतील शिवपुराण कथा भगवान शंकराची आराधना करण्याचा संदेश देणारी आहे. आपण तेहत्‍तीस कोटी देवांपैकी कोणाचीही आराधना करीत असला तरी, भगवान शंकराला तुम्हाला मानावेच लागेल. पंढपूरच्या दिलेल्या संदर्भाचा उल्लेख करुन पंडीत मिश्रा महाराज म्हणाले की, प्रसन्नता आणि निर्मल भावाने एक लोटा जल महादेवाला समर्पित करा.

दिपावली सणाचा उल्लेख करून पंडीत प्रदीप मिश्रा म्हणाले की, हिंदू धर्मात दिवाळी सणाचे महत्व खूप मोठे आहे. सर्व सिध्दी दिवाळीच्या पाच दिवसात मिळतात. कार्तिक महीन्यातील या पावन पर्वात आपण लक्ष्मी पूजन करणार आहात, मात्र घरातील स्त्री ही खरी लक्ष्मी असते. कारण कोणत्याही नात्यात असली तरी सर्वांच्या कल्याणाचा विचार करते. माणसाला सर्व सुख प्राप्त होतात ते घरातील लक्ष्मीच्या बळावर त्यामुळेच “सर्वे भुवन्तु सुखी” या विचाराने आपणही आयुष्याची वाटचाल करायला हवी.शिवपुराण कथेला का जाता म्हणून विचारणारे खूप तुम्हाला भेटतील, समाज माध्यमावर काहीजण प्रतिक्रीया देतील पण काही करायचे असेल तर स्वत:च्या मनाचे राजे व्हा, स्वत:चा रिमोट स्वत:कडे ठेवा. आपल्या जीवनाचा रिमोट दुस-यांच्या हाती देवून जगू नका. आपल्या जीवनाचे हक्कदार आपणच आहोत हे नक्की लक्षात ठेवण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आपल्‍या भाषणात या शिवनगरीमध्‍ये भाविकांचा भवसागर निर्माण झाला आहे. पंडितजींच्‍या मुखातून मागील पाच दिवस आपण सर्वांनी ऐकलेली शिवपुराण कथा ही जीवनाच्‍या सुखाचा एक नवा मार्ग सागणारी ठरली आहे. कार्तिक महिन्‍याच्‍या पावन पर्वात ऐकायला मिळालेली शिवपुराण कथा ही आपल्‍या सर्वांच्‍याच आयुष्‍याकरीता एक नवा आयाम ठरेल अशी अपेक्षा व्‍यक्‍त करुन, डॉ.सुजय विखे पाटील आणि त्‍यांच्‍या सर्व टिमने आव्‍हानात्‍मक परिस्थितीवर मात करुन, हा अध्‍यात्मिक यज्ञ यशस्‍वी केला. त्‍यांचा अभिनंदन करुन, लाखो भाविकांनी अतिशय उत्‍साहाने या शिवपुराण कथेमध्‍ये दाखविलेल्‍या उपस्थितीमुळे हा अध्यात्मिक सोहळा अधिक आनंददायी ठरला. या सोहळ्याच्‍या यशस्‍वीतेसाठी सर्वच शासकीय विभागांनी केलेल्‍या सहकार्याबद्दल त्‍यांनी कृतज्ञता व्‍यक्‍त केली.डॉ.सुजय विखे पाटील यांनी प्रांरभी शिवपुराण कथेच्‍या नियोजनाचा आढावा घेताना या सोहळ्यासाठी मंडप टाकतानाही मोठ्या स्‍वरुपात पाऊस पडला आणि कथेच्‍या सांगतेलाही पावसाने हजेरी लावली. हा परमेश्‍वरी योगायोग असल्‍याचे नमुद करुन, भाविकांची कोणतीही अडचण होवू नये म्‍हणून सर्व स्‍वयंसेवक कार्यकर्ते रांत्रदिवस मेहनत घेत होते. सर्वांनी मोठ्या उत्‍साहाने यामध्‍ये दिलेल्‍या योगदाना बद्दल त्‍यांनी आभार मानले.सांगता समारंभाच्‍या सोहळ्यास आ.विठ्ठलराव लंघे, आ.अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्‍य सचिव दिपक कपुर, जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी आधिकारी डॉ.आनंद भंडारी, अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, सौ.शालिनीताई विखे पाटील, सौ.स्‍नेहलता कोल्‍हे, सौ.धनश्री विखे पाटील, प्रांताधिकारी माणिकराव आहेर, तहसिलदार अमोल मोरे, गटविकास आधिकारी विवेक गुंड यांच्यासह जिल्‍ह्यासह राज्‍यातून आलेले भाविक मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!