पंडीत प्रदिप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा कार्यक्रमात पाकीटमारी व सोन्याच्या चैन चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई
२३ महिला व ०५ पुरुष यांचावर पोलिसांची कारवाई
पंडीत प्रदिप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा कार्यक्रमात पाकीटमारी व सोन्याच्या चैन चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांची कारवाई

२३ महिला व ०५ पुरुष यांचावर पोलिसांची कारवाई
लोणी । विनोद जवरे । पंडीत प्रदीप मिश्रा यांची दि.१२/१०/२०२५ते १६/१०/२०२५ रोजी दरम्यान निर्मळ पिंप्री ता. राहाता येथे शिवमहापुराण कथा आयोजीत करण्यात आली होती. या क्रायक्रमासाठी देशभरातून लाखो भाविक महिला व पुरुष सहभागी झालेले होते. सदर कथेमध्ये व शिर्डी मध्ये रॅली मध्ये येणाऱ्या भाविकांचे खिसे कापणे, महिलांच्या सोन्याच्या चैन कट करणे, भाविकांना मारहाण करून जबरी चोरी करणे या गैरकृत्यासाठी काही महिला व पुरुष आलेले आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यावरून अशा संशयितरित्या फिरणाऱ्या महिला व पुरुषांचा वेळोवेळी वॉच ठेवून त्यांचा शोधून त्यांना ताब्यात घेवून त्यांचे विरुध्द दरोड्याची पुर्वतयारी अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४),३१०(५) प्रमाणे गुन्हे नोंद करून कारवाई करण्यात आली आहे. सदरच्या महिला व पुरुष हे राजस्थान, हरियाणा राज्यातून व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून या गैरकृत्यासाठी सदर ठिकाणी आलेले होते. या संपुर्ण कार्यक्रमात चोऱ्यांना प्रतिबंध होण्यासाठी पोलीसांनी आहोरात्रपणे पायी पॅट्रोलींग व वाँच ठेवून सदरची कामगिरी केलेली आहे. सदर ताब्यात घेतलेले महिला व पुरुषांना गुन्ह्यांमध्ये अटक केलेली असून सर्वांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आलेली आहे. पकडण्यात आलेले महिला व पुरुष संख्या खालील प्रमाणे आहे.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री. सोमनाथ घार्गे, मा.अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर श्री. सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री. अमोल भारती, रणजित गलांडे, पोलीस निरीक्षक शिर्डी पोलीस स्टेशन कैलास वाघ सहायक पोलीस निरीक्षक लोणी पोलीस स्टेशन व संपुर्ण बंदोबस्तातील अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे.



