ब्रेकिंग

ज्ञानेश्वरी हे महाकाव्य मानवतेला दिशा देणारे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

अमृतेश्वर अखंड हरिनाम सप्ताह दीपोत्सव संपन्न

ज्ञानेश्वरी हे महाकाव्य मानवतेला दिशा देणारे – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

अमृतेश्वर अखंड हरिनाम सप्ताह दीपोत्सव संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी । वारकरी संप्रदायाला शेकडो वर्षांची परंपरा असून विविध जाती धर्मातील संतांनी प्रेमाचा व समतेचा संदेश सर्वांना दिला आहे. ज्ञानेश्वरी पारायण हा अमृता अनुभव असून ज्ञानेश्वरांचे ज्ञानेश्वरी हे महाकाव्य संपूर्ण विश्वाला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा.महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना येथील अमृतेश्वर मंदिरात 40 व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दीपोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ.कांचनताई थोरात, कारखान्याचे व्हा.चेअरमन पांडुरंग पा घुले, ह.भ.प गोविंद महाराज करंजकर, ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे, संचालक नवनाथ आरगडे, योगेश भालेराव, रामनाथ कुटे, अंकुश ताजने, विनोद हासे, ॲड बाबासाहेब गायकर, सौ.लताताई गायकर, ॲड.अशोक हजारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर सेक्रेटरी किरण कानवडे,कार्याध्यक्ष रामदास तांबडे, ह.भ.प.अरुण महाराज फरगडे, संदीप दिघे, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे,ह.भ.प.अरुण जोंधळे, राजू बड, यांच्यासह अमृत सांस्कृतिक मंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अमृतेश्वर मंदिरातील या सप्ताहाला मोठी समृद्ध परंपरा आहे. स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात,ह.भ.प.गावडे महाराज व कलामाई यांच्या प्रेरणेतून हा सप्ताह मागील 40 वर्षापासून सुरू आहे. ज्ञानेश्वरी गाथा पारायण यावर्षी 351 महिलांचा सहभाग असून ज्ञानेश्वरी पारायण हा जीवनातील अमृत अनुभव आहे. प्रत्येकाने एक तरी ओवी अनुभवावी असे सांगताना वारकरी संप्रदायाला मोठी परंपरा आहे.पंढरपूरचा पांडुरंग हे आराध्य दैवत म्हणून विविध जाती धर्मातील सर्व संतांनी समतेचा बंधुतेचा व प्रेमाचा संदेश दिला आहे. द्वेषला कुठेही थारा नाही. हा समतेचा बंधू भावाचा मंत्र आपल्याला जपायचा आहे. महाकवी संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी प्राकृत भाषेत आपल्याला दिली विश्वाच्या कल्याणासाठी त्यांनी विचार आपल्याला दिले. हे महाकाव्य मानवतेच्या कल्याणासाठी आहे.

जगामध्ये सध्या युद्ध सुरू आहेत भारतामध्ये अशांती आहे अशा परिस्थितीमध्ये वारकरी संप्रदायाचे निर्मळ तत्त्वज्ञान उपयोगी ठरणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.तर कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह सुरू असून महिलांची मोठी उपस्थिती आणि ज्ञानेश्वरी पारायण हे या सप्ताहाचे वैशिष्ट्य राहिले आहे. दीपोत्सव हा आनंदाचा क्षण असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली या परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असल्याचे ते म्हणाले. यावेळी अमृतनगर, घुलेवाडी सह संगमनेर मधील भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ह.भ.प गोविंद महाराज करंजकर,ह.भ.प.अरुण महाराज फरगडे व ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!