
मथुराबाई पाचोरे यांचे निधन

सोमवारी दशक्रिया विधी
कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगांव तालुक्यातील बहादराबाद येथील सामाजीक कार्यकर्त्या मथुराबाई रंगनाथ पाचोरे (वय 87 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक व धार्मिक कार्यात त्या सक्रिय सहभागी होत्या. अत्यंत मनमिळावू स्वभावामुळे त्या परिसरात सर्वत्र परिचित होत्या. त्यांच्या मागे पती, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांचा जाण्याने बहादराबाद गावात शोककळा पसरली आहे.

कोपरगाव तालुक्यातील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक श्री रंगनाथ बाळाजी पाचोरे यांच्या त्या पत्नी होत्या .त्याचा दशक्रिया विधी सोमवार दिनांक 23/03/2026 रोजी बहादराबाद येथे राहत्या घरी होणार आहे. त्याप्रसंगी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व दत्त ध्यान मंदिर शहा कारवाडी चे प्रमुख ह.भ.प.संतोष भाऊ जाधव यांचा प्रवचनाचा कार्यक्रम सकाळी 8:00 वाजता संपन्न होईल.



