सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार
संगमनेर । प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व 500 कोटींपेक्षा जास्त ठेवी असणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेस सहकारी बँकांमधील सर्वोत्कृष्ट आदर्श बँकेचा बँको ब्ल्यू रिबन पुरस्कार शानदार कार्यक्रमात मिळाला आहे. लोणावळा येथे नॅशनल बँक असोसिएशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रिझर्व बँकेचे माजी जनरल मॅनेजर भारदेश्वर बॅनर्जी यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांनी हा पुरस्कार स्वीकारला यावेळी समवेत व्हाईस चेअरमन ॲड नानासाहेब शिंदे, अण्णासाहेब शिंदे, किसनराव वाळके, ॲड लक्ष्मण खेमनर, राजेंद्र गुंजाळ श्रीमती ललिता दिघे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास वाणी आदी उपस्थित होते.माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाणी बँकेने सातत्याने ऑडिटचा अ दर्जा मिळून शेतकरी व सर्वसामान्य मदत केली आहे. अत्याधुनिक सुविधा, संगणकीय कामकाज, यामुळे बँकेला यापूर्वीही विविध पुरस्कार मिळाले आहेत.

याप्रसंगी बोलताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श शिस्तीवर बँकेची वाटचाल सुरू आहे. हा पुरस्कार सामूहिक कामाचा असून बँकेच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी काम केले आहे. याचबरोबर मागील दोन वर्षापासून दूध संघाच्या सहकार्याने छोट्या शेतकऱ्यांना बिगर तारण कर्ज उपलब्ध करून दिले आहे. बँकेने 950 कोटींचा व्यवसाय केला असून 555 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत तर 395 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. हे करत असताना एमपी हा अत्यंत कमी ठेवण्यात बँकेला यश मिळाले असल्याचे ते म्हणाले
तर नानासाहेब शिंदे म्हणाले की, मागील दोन वर्षात बँकेने चार शाखांचा विस्तार केला असून नजीकच्या काळामध्ये आणखी चार शाखा सुरू होणार आहे.तर बॅनर्जी म्हणाले की, ग्रामीण भागात असूनही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृतवाहिनी बँकेने केलेले काम इतर सर्व सहकारी बँकांसाठी दिशादर्शक ठरणारे आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, बाबासाहेब ओहोळ, ॲड माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, सौ दुर्गा ताई तांबे, शंकरराव पा खेमनर ,संपतराव डोंगरे, इंद्रजीत भाऊ थोरात यांचे सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे



