ब्रेकिंग

शिर्डीत अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड; १.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

शिर्डीत अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड; १.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जाहिरात मो-7756045359
शिर्डीत अवैध गुटखा विक्रीवर स्थानिक गुन्हे शाखेची धाड; १.७९ लाखांचा मुद्देमाल जप्त

कोपरगाव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा व सुगंधित तंबाखू विक्रीविरोधात कारवाई केली. १५ ऑगस्ट रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत तीन गुन्हे दाखल करून आठ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, एकूण १ लाख ७९ हजार १७ रुपयांचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पथक तयार केले होते. या पथकाने शिर्डी परिसरात माहिती घेऊन पंचांसमक्ष दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले.

पहिल्या कारवाईत विनोद बाबुराव ठोंबरे (वय ५०, रा. नांदुर्खी रोड, शिर्डी) याच्यासह हबीब उर्फ सोहेल अन्सारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत ४ हजार १५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दुसऱ्या कारवाईत बद्रीनाथ पंढरीनाथ लोखंडे (वय ५४, रा. शिर्डी) याच्यासह अलीम शेख व कलीम शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत १२ हजार ९५३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत जितेंद्र लालचंद लोढा (वय ४८, रा. रूई, ता. राहाता) याच्यासह बंटी लहामगे व अमोल जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत तब्बल १ लाख ६१ हजार ९०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणातील काही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध बीएनएस कलम १२३, २२३, २७४, २७५ व ३(५) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार विजय ठोंबरे, बिरप्पा करमल, अशोक लिपणे, राहुल डोके, रणजीत जाधव व अमृत आढाव यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!