ब्रेकिंग

शेतकरी महासन्‍मान किसान योजनेचा ७ वा हप्‍ता शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

जिल्‍ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतक-यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचा लाभ

शेतकरी महासन्‍मान किसान योजनेचा ७ वा हप्‍ता शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

जिल्‍ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतक-यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचा लाभ

लोणी ।  प्रतिनिधी । शेतक-यांच्‍या आर्थिक स्‍थैर्यासाठी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली महायुती सरकारने सुरु केलेल्‍या शेतकरी महासन्‍मान किसान योजनेचा ७ वा हप्‍ता शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग करण्‍यात आला असून, जिल्‍ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतक-यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचा लाभ मिळणार असून, शेतक-यांच्‍या बॅक खात्‍यात हा निधी वर्ग करण्‍यात आला असल्‍याची माहीती जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली.

शेतकरी महासन्‍मान किसान योजनेचा ७ वा हप्‍ता शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग – मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेच्‍या अंतर्गत पात्र लाभार्थ्‍यांना ७ व्‍या हप्‍त्‍याचा निधी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजीत पवार यांच्‍या उपस्थितीत औपचारिकपणे शेतक-यांना वितरीत करण्‍यात आला. केंद्र शासनाने सुरु केलेल्‍या प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजनेच्‍या धर्तीवर राज्‍य शासनानेही शेतक-यांसाठी ही अर्थसहाय्य योजना सुरु केली आहे. यामध्‍ये पात्र शेतक-यांना थेट आर्थिक सहाय्य देवून शेती खर्चाला हातभार लावण्‍याचा या योजनेचा उद्दे आहे.

जाहिरात – 7756045359

सातव्‍या हप्‍त्‍यामध्‍ये एप्रिल २०२५ ते जुलै २०२५ या कालावधीचे अनुदान लाभार्थ्‍यांना देण्‍यात आले असून, ज्‍या शेतकरी लाभार्थ्‍यांचा प्रधानमंत्री किसान सन्‍मान योजनेत समावेश आहे त्‍या सर्वांना राज्‍याच्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेचा लाभ मिळत असल्‍याचे पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी सांगितले. केंद्र शासनाच्‍या प्रधानमंत्री किसान सन्‍मान निधी योजने अंतर्गत पात्र शेतक-यांना दरवर्षी ६ हजार रुपये अनुदान देण्‍यात येते. केंद्र शासनाच्‍या या अनुदानामध्‍ये राज्‍य सरकार प्रतिवर्षी आणखी ६ हजार रुपये अनुदान देवून दरवर्षी १२ हजार रुपयांचा निधी शेतक-यांना दिले जात आहेत. राज्‍याच्‍या नमो शेतकरी महासन्‍मान निधी योजनेतून शेतकरी लाभार्थ्‍यांना आतापर्यंत एकुण ६ हप्‍ते देण्‍यात आले आहेत. त्‍यानुसार जिल्‍ह्यातील ५ लाख ४८ हजार ५५९ शेतक-यांना १०९ कोटी ७१ लाख १८ हजार रुपयांचे अनुदान मंजुर झाले असल्‍याचे मंत्री विखे पाटील म्‍हणाले.अकोले तालुक्‍यातील ३४ हजार ८५७ शेतक-यांना ६ कोटी ९७ लाख, जामखेड २९ हजार २७ शेतक-यांना ५ कोटी ८० लाख, कर्जत ४३ हजार ५५९ शेतक-यांना ८ कोटी ७१ लाख , कोपरगाव २९ हजार ५८६ शेतक-यांना ५ कोटी ९१ लाख, अहिल्यानगर ३० हजार ९३६ शेतक-यांना ६ कोटी १८ लाख, नेवासा ५४ हजार २०२ शेतक-यांना १० कोटी ८४ लाख, पारनेर ५० हजार २७१ शेतक-यांना १० कोटी ५ लाख, पाथर्डी ३९ हजार ८३५ शेतक-यांना ७ कोटी ९६ लाख, राहाता २४ हजार ७१ शेतक-यांना ४ कोटी ८१ लाख, राहुरी ३८ हजार ५२७ शेतक-यांना ७ कोटी ७० लाख, संगमनेर ५९ हजार ५२ शेतक-यांना ११ कोटी ७१ लाख, शेवगाव ४१ हजार ८३८ शेतक-यांना ८ कोटी ३६ लाख, श्रीगोंदा ५० हजार ४७३ शेतक-यांना १० कोटी ९ लाख, श्रीरामपूर २२ हजार ३२५ शेतक-यांना ४ कोटी ४६ लाख रुपये. अशा रक्‍कमा तालुका निहाय शेतक-यांच्‍या खात्‍यात वर्ग झाल्‍या असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!