स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय; चौथ्यांदा प्रथम पारितोषिकासह एक लाख रुपये जिंकले.
स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये अमृतवाहिनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा दैदिप्यमान विजय; चौथ्यांदा प्रथम पारितोषिकासह एक लाख रुपये जिंकले.

स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२४ मध्ये महाविद्यालयातील ६ संघांचा उल्लेखनीय सहभाग – प्राचार्य डॉ. एम . ए. वेंकटेश
संगमनेर (प्रतिनिधी)- अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय गेली ४१ वर्षे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची परंपरा हे महाविद्यालय विविध उपक्रमाद्वारे जपत आहे. विद्यार्थ्यांच्या विविध कौशल्य विकासासाठी नवनवीन उपक्रम महाविद्यालय द्वारे सतत राबविले जातात. एआयसीटीई (AICTE) व शिक्षण मंत्रालय दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने जगातील सर्वात मोठी डिजीटल उपक्रम स्पर्धा गेली ७ वर्षापासून आयोजित करण्यात येते. महाविद्यालयाला आतापर्यंत रुपये ७.५ लाखाचे पारितोषिक मिळाले आहे. सलग ७ वर्षे महाविद्यालयातील विद्यार्थी व त्यांचे मार्गदर्शक शिक्षक ह्या स्पर्धेत सहभाग नोंदवत आहे. ५४ केंद्रीय मंत्रालय व राज्य मंत्रालय यांना विविध क्षेत्रात येणारी आवाहने आणि अडथळे ओळखून प्रोब्लेम स्टेटमेंट तयार केली जातात. दैनदिन आयुष्यात भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे नाविन्यपूर्ण उकल व संशोधनातून उपाय शोधणे हे स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन स्पर्धेचे मुख्य उदिष्ट होय. उत्कृष्ट उकल व संशोधन असणाऱ्या संघाला अंतिम फेरीत सहभागी होता येते. सलग ३६ तास प्रोग्रामिंग कोडींग चालणाऱ्या स्पर्धेतून प्रथम पारितोषिक मिळवणाऱ्या संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेत सहभाग घेता येतो. ह्या वर्षी ६ संघ विविध केंद्रावर कोल्हापूर, दिल्ली, हुबळी(कर्नाटक), बेंगळूरू, कोईम्बतूर, चेन्नई येथे सहभागी झाल्याची, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.ए. वेंकटेश यांनी दिली.

एआयसीटीई व शिक्षण मंत्रालय भारत सरकार यांच्या नियमावली नुसार अंतरमहाविद्यालयीन हॅकॅथॉन फॉर स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४ हि स्पर्धा २९ ऑगस्ट ,२०२४ रोजी घेण्यात आली. स्पर्धेमध्ये ६६ संघ आणि ३९६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यापैकी ५० संघांची सॉफ्टवेअर व हार्डवेअर एडीशन साठी निवड करण्यात आली. अंतरमहाविद्यालयीन हॅकॅथॉन स्पर्धेचे आयोजन प्रा. विक्रम अभंग यांनी केले.महाविद्यालयातील ६ संघांची निवड महाअंतिम फेरी साठी झाली. ५ संघ हे सॉफ्टवेअर व १ संघ हार्डवेअर एडिशन साठी निवडण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनी दिलेल्या आयडीयाचे भारत सरकार कडून कॉपीराईटस पण घेतले आहे. देशातून ४९२३७ संघांनी सहभाग नोंदवला . ७५ मध्यवर्ती केंद्र ह्या स्पर्धेसाठी बनवण्यात आली होती. स्पर्धा दि. ११ डिसेंबर ते १२ डिसेंबर,२०२४ दरम्यान सलग ३६ तास कोडींग स्पर्धा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राज्याचे माजी महसूल मंत्री मा. बाळासाहेब थोरात , विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे , विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे , डायरेक्टर अकॅदेमिक्स डॉ. जे.बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे व संगणक विभाग प्रमुख डॉ. एस. के. सोनकर आणि सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



