ब्रेकिंग

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड दुर्दैवी – भास्करराव पानसरे

घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची हेळसांड दुर्दैवी – भास्करराव पानसरे

संगमनेर । प्रतिनिधी । आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या सुविधासाठी अद्यावत ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले मात्र सध्या या रुग्णालयामध्ये रुग्णांची काळजी घेतली जात नसून मेडिकल व इतर बाबत अत्यंत हेळसांड केली जात असल्याची टीका घुलेवाडीचे माजी सरपंच भास्करराव पानसरे यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते भास्करराव पानसरे  यांनी म्हटले आहे की, घुलेवाडी हे संगमनेर नंतर मोठे गाव झाले आहे या ठिकाणी तालुक्याकरता अद्यावत असे ग्रामीण रुग्णालय लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उभारले सर्व सुविधा निर्माण करून दिल्या. मात्र सध्या प्रशासन हे जनतेच्या विरोधी काम करत असून रुग्णांना कोणत्याही प्रकारची चांगली सुविधा मिळत नाही त्याचप्रमाणे मेडिकलच्या बाबत अत्यंत आरेरावीचे उत्तरे दिले जातात नातेवाईकांना कोणतेही मार्गदर्शन होत नाही. अस्वच्छतेसह सर्व बाबी अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका करताना तातडीने ग्रामीण रुग्णालयाच्या सुधारणा कराव्या अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल अशी मागणी ही त्यांनी केली

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!