डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा

अहिल्यानगर । प्रतिनिधी । डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट, अहिल्यानगर येथे राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचा कार्यक्रम दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. गोकुळदास गायकवाड (संचालक, ई.टी.आय., रा.से.यो. अहिल्यानगर), प्रा. मंदार बिडवे (रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, विळद घाट), कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत, उपप्राचार्य प्रा. डॉ. हरिभाऊ शिरसाट, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे, प्रा. जयश्री राऊत, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. डॉ. दौलतराव नलावडे, प्रा. पुष्पा हसनाळे, प्रा. डॉ. माळवे, प्रा. पुनम ठोंबरे, प्रा. डॉ. ईश्वर गटुल, प्रा. डॉ. रोंगे, प्रा. डॉ. खेडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना प्रा. डॉ. गोकुळदास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक जीवनातील राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रबांधणीसाठी आणि सामाजिक उत्कर्षासाठी आपले संकल्प पक्के करून सामाजिक कार्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सोमेश्वर राऊत यांनी स्वयंसेवकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण दांगडे यांनी विद्यार्थ्यांना रा.से.यो. विभागाचा इतिहास, विविध योजना तसेच वार्षिक नियोजित कार्यक्रमांची माहिती दिली. यापूर्वी मौजे नांदगाव, मांजरसुंबा, टाकळी काझी, हिंगणगाव आणि डोंगरगण या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष शिबिरांमधील उपक्रम जसे की रक्तदान, स्वच्छता मोहीम, जल व मृदा संवर्धन, डिजिटल साक्षरता, तसेच जनजागृतीद्वारे गावकऱ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविण्याचे कार्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रा. मंदार बिडवे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो व त्यांना समाजसेवेची संधी मिळते, असे प्रतिपादन केले.कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच स्वयंसेवक कु. सौरभ नांद्रे आणि स्वयंसेविका कु. प्रगती देवकर यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एस. दांगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वयंसेवक कु. प्रसाद पाटील यांनी केले.या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, सेवकवर्ग तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



