ब्रेकिंग

कोपरगांव शहराला गोदावरीच्या पुराचा धोका??

लहान पूल पाण्याखाली !

कोपरगांव शहराला गोदावरीच्या पुराचा धोका??
लहान पूल पाण्याखाली !
कोपरगाव । विनोद जवरे ।
गोदावरी नदी पात्र दुधडी वाहत असल्याने कोपरगाव शहराला पुराचा धोका संभवत असल्याने प्रशासन अलर्ट मोड वर आले आहे.खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार यांनी गोदावरी नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन कोपरगावचे  केले आहे तर रविवार दिनांक 8२८ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता नांदूर मधमेश्वर धरणा मधून ८७ हजार ५४९ क्युसेक पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे तसेच अजूनही टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे तसेच पावसाचे प्रमाण लक्षात घेता पाणी विसर्गा मध्ये देखील वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा गोदावरी नदी पात्रालगतच्या नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना तहसील प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या असून गोदावरी नदी वरील लहान पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच नागरिकांनी पाणी बघण्यासाठी लहान पूल परिसरात मोठी गर्दी केली असून नगरपरिषदेच्या वतीने नागरिकांना दूर उभे राहण्याच्या सूचना यावेळी नगरपरिषदेचे कर्मचारी व होमगार्ड करत आहेत.
जाहिरात – 7756045359
दरम्यान, राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज मौनगिरी सेतू म्हणजेच लहान पूल पाण्याखाली गेला आहे. पुलापर्यंत पाणी पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहतुकीवरही अंशतः परिणाम झाला आहे
नदीकाठच्या वस्त्या, शेतजमिनी व पूरग्रस्त भाग धोक्याच्या झोनमध्ये आल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकाठापासून दूर राहावे, तसेच सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन तहसील प्रशासन व पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!