पोहेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी

पोहेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी


पोहेगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उत्साहात साजरी
पोहेगांव । प्रतिनिधी । कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे रविवारी दि.३१ मे रोजी सकाळी ९.०० वा. ग्रामपंचायत कार्यालयात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे, उपसरपंच अमोल औताडे, भाऊसाहेब सोनवणे, संभाजी सोनवणे, रामनाथ सोनवणे, राजेंद्र सोनवणे, मच्छिंद्र सोनवणे, विकास सोनवणे, मारुती सोनवणे, योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, आशिष वाघमारे, गोरख कांदळकर, दत्तात्रय बढे, सुरेश बढे, निवृत्ती सोनवणे, गोरक्षनाथ शेळके, शंकर कांदळकर, अशोक भडांगे, ओम सोनवणे, वैभव सोनवणे, विक्रम सोनवणे, भगवान सोनवणे, आनंद पानगव्हाणे, ऋतुराज सोनवणे, सुनिल सोनवणे , गणेश सोनवणे आदी उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कुशल प्रशासनाची, समाजहितासाठी केलेल्या कार्याची आणि त्यांच्या दूरदृष्टीची माहिती दिली. तसेच जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी पोहेगावच्या ऐतिहासिक वारशाविषयी माहिती देत समाजबांधवांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले तसेच उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन केले.शेवटी सर्वांच्या आभार उपसरपंच अमोल औताडे यानी मानले.



