ब्रेकिंग

भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

देशाची लोकशाही वाचवणे खरी गरज

जाहिरात मो-7756045359
भाऊबीज हा सण बहिण भावाच्या प्रेमाचे प्रतीक – माजीमंत्री बाळासाहेब थोरात

देशाची लोकशाही वाचवणे खरी गरज
संगमनेर । प्रतिनिधी।  निवडणुका या सत्ते करता किंवा पदाकरता लढायच्या नसून लोकशाही वाचवण्याकरता लढणे गरजेचे आहे. सध्या लोकशाही व राज्यघटना धोक्यात आली असून लोकशाही विचारांच्या असणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असून दीपावली हा मानवतेचा संदेश देणारा कालखंड आहे. यामधील भाऊबीज हा सण बहिण भावाच्या नात्याचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

माजी नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई  तांबे यांच्या इंदिरानगर येथील प्रभा निवासस्थानी भाऊबीज प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.कांचनताई थोरात, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, डॉ.मैथिलीताई तांबे,डॉ.हर्षल तांबे आदींसह कुटुंबातील सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात मो-7756045359

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, वर्षभर प्रत्येकजण कष्ट करतो धावपळ करतो मात्र दिवाळीचा हा कालखंड सर्वांच्या जीवनात आनंद देणार असतो. हा समानतेचा बंधू भावाचा मानवतेचा संदेश देणारा असा गोडीचा सण आहे. हा सण सर्वांनी आनंदाने साजरा केला पाहिजे. भाऊबीज हा दीपावली मधील महत्त्वाचा उत्सव असून बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण आहे. बहिण भावांमधील जिव्हाळा आपुलकी प्रेम यामधून अधिक दृढ होते.

यावर्षी संगमनेर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकरी व्यापारी यांची दिवाळी चांगली आहे. मात्र मराठवाडा विदर्भ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील पूर्व भागामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही काळजीची गोष्ट आहे. सरकारने अशा शेतकऱ्यांना भरीव मदत केली पाहिजे आणि राज्यभरातील संपूर्ण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे. ही तर आमची प्राथमिक मागणी आहे.नगराध्यक्ष पदाच्या काळामध्ये सौ.दुर्गाताई तांबे यांनी अत्यंत उल्लेखनीय काम केले. स्वच्छ संगमनेर सुंदर संगमनेर हरित संगमनेर ही संकल्पना प्रभावीपणे राबवली. स्वच्छतेबाबत आणि चांगल्या कामाबाबत हजारो कोटींचे बक्षीसह नगरपालिके करता मिळवले. यामध्ये नागरिकांचाही मोठा सहभाग राहिला आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होत असून समविचारी व लोकशाही वाचवणाऱ्या पक्षाने एकत्र येणे गरजेचे आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय होणार असून राज्यघटना आणि लोकशाही वाचवणे हे पक्षांचे आणि प्रत्येकाचे काम आहे.

जाहिरात मो-7756045359

निवडणूका ह्या सत्तेसाठी किंवा पदासाठी करायचा नसून देश हितासाठी आणि लोकशाही अधिक सुदृढ करण्यासाठी करायचे असतात. असे सांगताना दीपावली निमित्त सर्व नागरिकांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, दीपावली हा आनंदाचा कालखंड आहे. दर दीपावली लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याची दिवाळी मोठ्या आनंदाने साजरी होते. थोरात साहेबांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आहे. आपण सर्व त्या परिवारातील घटक असून जीवनाचा हा कालखंड आनंदी जावा यासाठी सर्वांचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.यावेळी डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आ.सत्यजित तांबे यांचे सह उपस्थित सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचेही औक्षण केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!