ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम संत व कलावंतांचा सन्मान केला – बाबासाहेब सौदागर

संगमनेर ही उत्तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी

लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम संत व कलावंतांचा सन्मान केला – बाबासाहेब सौदागर

संगमनेर ही उत्तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
संगमनेर ।  प्रतिनिधी । आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा समृद्ध वारसा जोपासणारे बाळासाहेब थोरात यांनी कायम संत आणि कलावंतांचा सन्मान केला आहे. आध्यात्मिक विचार आणि सांस्कृतिक परिपक्वता असलेले महाराष्ट्राचे नेते म्हणून काम करताना त्यांनी अनेक कलावंतांना उभे केले. सातत्यपूर्ण विविध उपक्रम संगमनेर शहरात राबवले जात असून उत्तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असा गौरवाने उल्लेख संगमनेरचा करावा असे प्रतिपादन चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी केले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्याभवन शाळा येथे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, सिताराम राऊत,रामदास तांबडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदिसह मुख्याध्यापक,शिक्षक,विध्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना कवी बाबासाहेब सौदागर म्हणाले की, यशवंतराव चव्हाण नंतर माथा टेकवावा असे नेतृत्व माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आहे. संतांचा,कलावंतांचा त्यांनी नेहमी सन्मान केला आहे. राज्यभरातील अनेक कलावंतांना मोठी मदत केली आहे. साहित्य संस्कृती जपणारा हा महाराष्ट्राचा जाणकार नेता असून संगमनेर मध्ये सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.

एकही दिवस असा जात नाही की वर्तमानपत्र उघडल्यानंतर संगमनेर मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नाही असे दिसत नाही भरपूर कार्यक्रमांची रेलचेल असून राज्यभरातील मोठ्या कलावंतांसह स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे. किंबहुना सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यातून आय लव संगमनेर या चळवळीच्या माध्यमातून युवकांसाठी सांस्कृतिक व्यासपीठ निर्माण केले आहे.कवी अनंत फंदी, पवळा हिवरगावकर,विठ्ठल उमप अशा मोठ्या थोर परंपरा असलेल्या कलावंतांची ही भूमी आहे. या सर्वांप्रती त्यांनी कायम आदर आणि कृतज्ञता व्यक्त केले असून त्यांचा राज्य पातळीवर गौरव होईल असे काम केले आहे. हीच परंपरा आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात पुढे नेत असल्याचे ते म्हणाले.

जाहिरात – मो-7756045359

आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, माणसाला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा असेल तर जीवनामध्ये खरा आनंद मिळतो आणि संगमनेर मध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कायम सांस्कृतिक वातावरण राहिले आहे. कवी अनंत फंदी खुलेनाट्यगृह व्हावे याकरता माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून सुमारे 12 कोटीतून हे अद्यावत व वैभवशाली नाट्यगृह उभारले गेले असून याचे काम अंतिम टप्प्यांमध्ये आहे लवकरच हे नाट्यगृह सर्वांसाठी खुले होईल असेही ते म्हणाले.यावेळी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात विद्याभवन शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!