कोपरगाव तालुका हद्दीतील चासनळी शिवारात गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा
Dysp संदीप मिटके यांचे पथकाची कारवाई
कोपरगाव तालुका हद्दीतील चासनळी शिवारात गावठी हातभट्टी अड्ड्यावर छापा
Dysp संदीप मिटके यांचे पथकाची कारवाई
कोपरगांव । विनोद जवरे ।
दि 16/11/2023 रोजी Dysp संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रा मध्ये खडकाच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खत्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अमलदार यांनी कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारातील गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी तयार करण्याचे कच्चे रसायन व तयार गावठी हातभट्टी दारूवर कारवाई करून एक लाख दोन हजार रुपये मुद्दे मालाचा नाश करण्यात आला आहे सदर बाबत पोलीस नाईक श्याम जाधव यांचे फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा . रजिस्टर नंबर 543/2023 मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 (फ)(ई) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर माननीय स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूरdysp संदीप मिटके साहेब शिर्डी पोलीस निरीक्षक देसले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक शिंदे पोलीस नाईक श्याम जाधव पोलीस कॉन्स्टेबल युवराज खुळे अशांनी केली आहे