ब्रेकिंग

बाळासाहेब गव्हाणे मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी – राजेश परजणे

परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

जाहिरात मो-7756045359

बाळासाहेब गव्हाणे मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी – राजेश परजणे

परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

कोपरगांव । प्रतिनिधी । नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे आरोग्यदूत बाळासाहेब गव्हाणे व त्यांच्या मित्र मंडळाचे कार्य प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार महानंदाचे संघाचे माजी अध्यक्ष तथा नामदेवरावजी परजणे पाटील गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेशआबा परजणे यांनी वह्या वाटप कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले

महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध उत्पादक संघ सहजानंदनगरचे चेअरमन राजेशआबा नामदेवराव परजणे पाटील यांच्या आज शनिवार दि २२ नोव्हेंबर २०२५ रोजी ५६ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील मनेगाव, काकडी,खालकर मळा, गोर्डे वस्ती,डांगेवाडी,अंजनापूर, म्हसोबा वस्ती, देशमुख मळा, रांजणगाव, बहादरपूर, मल्हारवाडी,गव्हाणे वस्ती, गुंजाळ वस्ती, बहादरबाद,जवळके आदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ३ हजाराहून अधिकच्या वह्याचे वाटप आरोग्य दूध बाळासाहेब यशवंत गव्हाणे व मित्रपरिवार यांच्या वतीने राजेश परजणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.


याप्रसंगी राजेश परजणे यांनी बोलताना सांगितले की, जितके पुण्य अन्नदान केल्याने मिळते तितकेच पुण्य शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केल्याने मिळते. त्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त बहादरपूर परिसरातील १५ हून अधिक च्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्यदूत बाळासाहेब गव्हाणे व मित्र मंडळाच्या वतीने वह्या वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले सदर केले तर परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळा अतिशय उत्कृष्ट असून यातून घडलेले अनेक विद्यार्थी देश-विदेशात आपल्या शाळेचे गावाचे नाव रोशन करत असल्याने हे नक्कीच परिसरासाठी भूषणावह बाब आहे.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाळासाहेब राहाणे यांनी सूत्रसंचालन शरद आहेर यांनी तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक डोंगरे सर यांनी व्यक्त केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!