सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाईक यांचा पोलीस मुख्यालयात सत्कार

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाईक यांचा पोलीस मुख्यालयात सत्कार


सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नाईक यांचा पोलीस मुख्यालयात सत्कार
अहिल्यानगर । प्रतिनिधी । पोलीस दलामध्ये तब्बल 35 वर्षे प्रामाणिक, निष्ठावान व कर्तव्यदक्ष सेवा बजावून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले श्री. प्रकाश मुरलीधर नाईक यांचा पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते श्री. नाईक यांचा शाल, श्रीफळ, वृक्ष, हेल्मेट व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.

मूळचे गुंडेगाव, ता. नगर, जि. अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या श्री. प्रकाश मुरलीधर नाईक यांनी पोलीस दलात 35 वर्षे उल्लेखनीय सेवा बजावत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि जनसेवा यांचा आदर्श निर्माण केला. सेवानिवृत्तीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व समृद्ध जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.



