ब्रेकिंग

बहादरबाद परीसरात बिबट्याचे दर्शन; बिबट्या कॅमेऱ्यात कैद

स्थानिक परिसरामध्ये भितीचे वातावरण

जाहिरात – मो-7756045359
बहादरबाद परीसरात बिबट्याचे दर्शन; बिबट्या कॅमेऱ्यात कैद

स्थानिक परिसरामध्ये भितीचे वातावरण

कोपरगांव । विनोद जवरे । कोपरगांव तालुक्यातील बहादरबाद परिसरात गुरुवारी (ता. ६ ) रात्री आठच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे शेतकरी तसेच नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगांव तालुक्यात बिबट्या म्हणजे नित्याचाच एक भाग झाला आहे. बिबट्यांकडून शेळ्या मेंढ्यांवर तसेच लहान मुले यांच्यावर हल्ले होत असतानाच आता मानवी जीवन देखील असुरक्षित वाटू लागले आहे.

बहादरबाद येथील शेतकरी रात्री आठच्या सुमारास पाचोरे वस्तीवर दुध घेण्यासाठी जात होते. याच वेळी रस्त्याच्या कडेला निवांत बसलेला बिबट्या त्यांना दिसला. गाडीच्या उजेडामुळे हा बिबट्या उठला आणि रस्ता ओलांडून निघून गेला. वनविभगाने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.यापूर्वीही या भागात बिबट्याचे अनेक वेळा दर्शन झाले असून बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

जाहिरात – 7756045359

दरम्यान, नागरिक रात्रंदिवस बिबट्याच्या भीतीखाली वावरत आहेत. शेतीची कामे करताना जीव मुठीत धरून कामे करावी लागत आहेत. वनविभागाने या परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बहादरबाद मधील नागरिक करत आहेत

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!