ब्रेकिंग

जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना – मंत्री विखे पाटील 

जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज

जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना – मंत्री विखे पाटील

जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज

लोणी । प्रतिनिधी ।  जिल्ह्यात बिबट्यांकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासनाला सर्वतोपरी उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून,वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले आहे.उपाय योजनासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यामातून निधी देण्याची तयारी असल्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

वनविभागाच्या हलगर्जी पणावर मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी

मंत्री विखे पाटील यांनी जिल्ह्यातील बिबट्यांच्या हल्ल्याच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी वनविभागाच्या वतीने केलेल्या उपाय योजनांची माहीती जिल्ह्याचे मुख्य वनसंरक्षक सालविठ्ठल यांच्याकडून घेतली.जिल्ह्यात ११५० बिबटे असल्याचा अंदाज आहे मात्र यापैकी २५बिबट्यांना पकडण्यात यश आले आहे.मात्र वनविभागाच्या हलगर्जी पणावर मंत्री विखे पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.जिल्ह्यात ३५०पिंजरे लावले आहेत.४ थर्मल ड्रोन्स् ४ट्रॅग्युलायझेशन गन्स आणि २५०ट्रॅप कॅमेरे जिल्ह्यात कार्यान्वित केले असले तरी बिबट्यांचा वावर चिंताजनक आहे.जिल्ह्यातील वाढत्या घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनास तातडीने बैठक घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.त्यानूसार बैठकीत अधिकचे उपाय करण्याबाबत प्रशासनाने निर्णय केले असले तरी वनविभागाने आवश्यक असलेल्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात दाखवलेल्या निष्क्रीयतेवर मंत्री विखे पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील घटनांचे गांभीर्य लक्षात आणून दिले आहे.जिल्ह्या करीता २२रेस्क्यू वाहन,अतिरीक्त पिंजरे ट्रॅग्युलायझेशन गन तसेच कृत्रिम बुध्दीमतेचा वापर करून ड्रोनद्वारे स्थळ निरीक्षण करण्यासाठी अधिकची यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी निधी उपलब्ध करून देवू मात्र वनविभागाने प्रस्ताव तरी पाठवले पाहीजेत आशी अपेक्षा मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!