ब्रेकिंग

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हंगेवाडी येथे मंगळवारी भव्य शेतकरी मेळावा

सुभाष चंद्र बोस पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हंगेवाडी येथे मंगळवारी भव्य शेतकरी मेळावा

सुभाष चंद्र बोस पतसंस्थेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

संगमनेर । प्रतिनिधी । माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पतसंस्था आणि दूध संस्थायातून ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध करणारा संगमनेर तालुका आहे. हंगेवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने उभारलेल्या नवीन अद्यावत इमारतीचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना गणपतराव सांगळे म्हणाले की, संगमनेर तालुक्यात सहकारातून समृद्धी निर्माण झाली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली दूध संस्था व पतसंस्था एकत्र असा हा पॅटर्न राज्याला दिशादर्शक ठरला आहे. पतसंस्थांच्या निकोप चळवळीमुळे तालुक्यातील नागरिकांना मोठी मदत झाली आहे नेताजी सुभाष चंद्र बोस पतसंस्थेने कायम हंगेवाडी परिसरातील नागरिकांना आर्थिक मदत केली आहे काटकसर पारदर्शकता आर्थिक शिस्त यातून या पतसंस्थेने मोठा लौकिक निर्माण केला असून अत्याधुनिक इमारत उभारली आहे.या इमारतीचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमासाठी आमदार सत्यजित तांबे,बाजीराव पाटील खेमनर, सौ.दुर्गाताई तांबे, ॲड.माधवराव कानवडे, प्रतापराव ओहोळ, रणजितसिंह देशमुख, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत भाऊ थोरात,शंकरराव खेमनर,डॉ.जयश्रीताई थोरात,सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे,हौशीराम सोनवणे, पांडुरंग पाटील घुले, रामहरी कातोरे, नानासाहेब शिंदे,राजेंद्र कडलक, राजेंद्र चकोर,अजय फटांगरे,सौ.अर्चना बालोडे आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी सर्व नागरिक, शेतकरी बंधू व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन नेताजी सुभाषचंद्र पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रतीक गणपतराव सांगळे व सर्व संचालक मंडळ यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!