ब्रेकिंग
जवळके येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात
सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा

जवळके येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास सुरूवात


सप्ताह कालावधीत राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा
कोपरगांव । प्रतिनिधी । सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की सालाबादप्रमाणे याही वर्षी आनंद कोटी ब्रम्हांडनायक पंढरी पांडुरंगाच्या कृपेने, योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व गुरुवर्य श्रीपाद महाराज माऊली यांच्या आशीर्वादाने तसेच महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने व समस्त ग्रामस्थ जवळके यांच्या मार्गदर्शनाने चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास मंगळवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सप्ताह सोहळ्यास प्रारंभ झालाआहे या सप्ताहात कालावधी दररोज विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यांत आलेले आहे.

या काळात राज्यभरातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा सप्ताह कालावधीत संपन्न होणार आहे यामध्ये 18/8 ऑगस्ट रोजी ह.भ.प. मयुर महाराज पाचोरे ( बहादरबाद ) ,19 ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रा. गोरख महाराज जगताप ( शिंदेवाडी ) 20ऑगस्ट रोजी ह.भ.प. विलास महाराज मदने, 21 ऑगस्ट रोजी ह.भ.प.अरूण महाराज दिघे ( तळेगाव ) 22 ऑगस्ट रोजी ह.भ.प. प्रतिक्षाताई जाधव ( शिर्डी ) , 23ऑगस्ट रोजी ह.भ.प. शिवाजी महाराज तळेकर , 24 ऑगस्ट काशिकानंदजी महाराज परमहंस तसेच 25 ऑगस्ट रोजी ह.भ.प. स्वरुपानंदगिरी महाराज (मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा) यांचे काल्याचे किर्तन सकाळी 11 ते 1 होईल तसेच यावेळी ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी जवळके ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आलेले आहे.



