प्रवरा अभिमत विद्यापीठाचा शनिवारी १९ वा पदवीदान समारंभ
९०० विद्यार्थ्यांना पदवी तर १३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करणार
प्रवरा अभिमत विद्यापीठाचा शनिवारी १९ वा पदवीदान समारंभ

९०० विद्यार्थ्यांना पदवी तर १३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करणार
लोणी । प्रतिनिधी । प्रवरा इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस, लोणी या अभिमत विद्यापीठाचा १९ वा पदवीदान समारंभ शनिवार ता. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता प्रवरा वैद्यकिय महाविद्यालयाच्या मैदानावर संपन्न होणार असल्याची माहीती पिम्स विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी दिली.

पदवीदान समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री प्रकाशजी आबीटकर, तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समवेत पिम्स विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त सौ. मोनिकाताई सावंत, विश्वस्त श्री ध्रूव विखे पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.यावेळी एमआरआय स्कॅनिंग अतिशय जलद अधिक अचूक व गुणवत्तापुर्ण होण्यासाठी कृत्रिम बुध्दीमत्तेचा वापर करून फिलिप्स कंपनीचे स्मार्ट स्पीड ए.आय. एमआरआय स्कॅनिंग मशिन जे ग्रामीण आशिया खंडात प्रथमच प्रवरेत कार्यान्वित होणार असून यासोबत एम.आर. इलॅस्टोग्राफि सुविधा उपलब्ध आहे, याबरोबरच क्राफ्टन इंडिया कंपनीच्या सीएसआर मार्फत तोंडाचा कर्करोग सुरूवातीलाच लक्षात यावा व त्याबाबत जनसामान्यांमध्ये जाग़ृती व्हावी यासाठी कर्करोग चिकित्सा दातांचा फिरता दवाखाना अत्याधुनिक सुविधेसह ( मोबाईल व्हॅन) कार्यान्वित करण्यात येणार आहे.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या सर्व महाविद्यालयातील एकूण ९०० विद्यार्थ्यांना पदवी तर १३ विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान केली जाणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुलगुरू डॉ. विष्णू मगरे यांनी केले आहे.



