ब्रेकिंग

जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण समिती  कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी प्रा. डॉ. अभिजित मेरेकर यांची निवड

जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण समिती  कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी प्रा. डॉ. अभिजित मेरेकर यांची निवड

अहिल्यानगर । प्रतिनिधी । आरोग्य क्षेत्रातील महत्वाच्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना अधिक प्रभावीपणे व पारदर्शक पणे राबविण्यासाठी जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण समिती मध्ये विशेष निमंत्रित सदस्य म्हणून प्रा. डॉ. अभिजित मेरेकर यांची निवड झाली आहे.

ही नियुक्ती अहिल्यानगरचे पालक मंत्री व राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्दशानुसार केली आहे. त्यांची आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बघता, त्यांची ह्या समिती मध्ये तज्ज्ञ व्यक्ती म्हणून समावेश केला गेला आहे. प्रा. डॉ. अभिजित मेरेकर हे आरोग्य क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्व असून ते नेहमीच नागरिकांच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतात. योजनेंतील अडचणी दूर करून, योजना प्रभावी व पारदर्शक पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचवणे हे त्यांचे प्रमुख ध्येय असेल. या नियुक्तीबद्दल मा. खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, वैद्यकीय संचालक प्रा. डॉ. अभिजित दिवटे व डायरेक्टर क्लिनिकल ब्रिगेडीयर डॉ. अरुण त्यागी यांनी डॉ. मेरेकर यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!