ब्रेकिंग

मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई 

मेहुणबारे पोलीस स्टेशनकडून अवैध शस्त्रे बाळगणारे इसमांवर कारवाई 

अवैध शस्त्रे जवळ बाळगून दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कठोर कारवाई होणार – प्रभारी अधिकारी  प्रविण दातरे  

चाळीसगांव । प्रतिनिधी । जिल्हा पोलीस अधिक्षक मा. डॉ. श्री महेश्वर रेडडी सो, अपर पोलीस अधिक्षक, चाळीसगांव मा. श्रीमती कविता नेरकर सो, व उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगांव उप विभाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड सो, यांनी पोलीस स्टेशन हददीत अवैध शस्त्रे बाळगून दहशत करणाऱ्या इसमांवर कारवाया करणेबाबत मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.

आज दिनांक 02/08/2025 रोजी मेहुणबारे पोलीस स्टेशन हददीतील दोन इसम हे त्यांच्या ताब्यात अवैध शस्त्रे बाळगून दहशत करीत असले बाबत माहीती प्राप्त झाली होती. सदर गोपनिय माहितीच्या आधारे इसम नामे 1) सुकलाल सुरेश सोनवणे 2) किरण यशवंत सोनवणे दोघे रा. उंबरखेड, ता. चाळीसगांव हे भिका सिताराम गायकवाड यांचे घर, उंबरखेड, ता. चाळीसगांव येथे विनापरवाना अवैधरित्या एक धारदार लोखंडी तलवार व एक धारदार लोखंडी कुकरी अशी धारदार शस्त्रे स्वतःजवळ बाळगताना मिळून आले असता त्याबाबत पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करून नमुद इसमांकडून सदरची शस्त्रे जप्त करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही आरोपीतांविरूध्द मेहूणबारे पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 186/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) व 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास मेहूणबारे पोलीस स्टेशन करीत आहे.

सदरची कामगिरी मा. वरिष्ठांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्री प्रविण अ. दातरे, सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक श्री सुहास आव्हाड, पोलीस उप-निरीक्षक श्री विकास शिरोळे, पोहेकॉ मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, पोकों विनोद बेलदार, भुषण बावीस्कर, चापोकों ईश्वर देशमुख यांनी केली आहे.तरी चाळीसगांव व परिसरातील युवकांना सुचित करण्यात येते की, अशा प्रकारे विना परवाना अवैध शस्त्रे जवळ बाळगून दहशत करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच चाळीसगांव व परिसरातील नागरिकांना आव्हान करण्यात येते की, असे कृत्य निदर्शनास आल्यास त्याबाबत मेहूणबारे पोलीस स्टेशन अथवा नियंत्रण कक्ष जळगांव येथे कळवावे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!