ब्रेकिंग
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
आमदार सत्यजित तांबे व डॉ.मैथिलीताई तांबे यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांचा गुलाम – माजीमंत्री बाळासाहेब थोरात
आमदार सत्यजित तांबे व डॉ.मैथिलीताई तांबे यांनी परिवारासह बजावला मतदानाचा हक्क
संगमनेर । प्रतिनिधी । लोकशाही प्रक्रिया ही निकोप असावी. निवडणूक आयोगाने मतदानासाठी निर्दोष कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. मात्र असे होत नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. निवडणूक आयोगाचा कार्यक्रम हा मंत्रालयातील कुणीतरी पीए ठरवत असून त्याची अंमलबजावणी आयोग करत आहे. निवडणूक आयोग हा पूर्णपणे सत्तेचा गुलाम झाले असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

संगमनेर मध्ये माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना ते म्हणाले की, राज्यघटना आणि देश टिकवण्यासाठी लोकशाहीमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या मतदार प्रक्रियेमध्ये निर्दोष कार्यक्रम जाहीर होत नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. दोन दिवसांवर निवडणूक प्रक्रिया येते आणि त्यानंतर स्थगित केले जाते. हा प्रकार कधीच घडला नाही. असं आता घडत आहे हा काय गोंधळ चालला आहे. असा सवाल करताना मंत्रालयातील कोणीतरी पीए निवडणूक कार्यक्रम असतो आणि निवडणूक आयोग तो जाहीर करतो असे आमचे स्पष्ट मत आहे. कारण निवडणूक आयोगातील अधिकारी उच्च पदस्थ असतात. त्यांना निवडणुकीचा अनेक वेळा अनुभव असतो. परंतु ते सत्तेच्या दबावाखाली काम करत आहे.मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे. याबाबत आम्ही अनेक वेळा दाद मागितली. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत आहे. मतदार याद्या दोष दुरुस्त करावा अशी आमची मागणी असताना साधा तहसीलदार उत्तर देतो तो दूर होऊ शकत नाही. मतदार यादी गोंधळ आणि ईव्हीएम बाबत ते काहीही करू शकतात हे सर्व देशाने पाहिले आहे. त्यामुळे आज मतदान झाल्यानंतर उद्याच मतमोजणी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. कारण वीस दिवस ईव्हीएम पेट्यांचे काय होईल याबाबत सर्व देशातील जनतेला शंका आहे. कारण सत्ताधाऱ्यांची वागणे असे आहे की शंका येणे साहजिक असल्याचे ते म्हणाले.तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कायम विकासाचे कामे केली आहेत. विकासासाठी सातत्याने निधी आणला आहे. संगमनेर तालुका व शहर हा एक परिवार असून जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. सेवा समितीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर डॉ.मैथिलीताई तांबे म्हणाल्या की, विरोधकांचे काम आरोप करणे असा आहे. तर आमचे काम काम करत राहणे आहे. काम केले आहे कमाल करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, डॉ.हर्षल तांबे, डॉ.वर्षा ताई तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला
संगमनेर शहरात मोठा उत्साह
नगरपरिषदेची निवडणूक नऊ वर्षानंतर होत असून संगमनेर शहर व उपनगरांमधील नागरिकांमध्ये मतदानाबाबत मोठा उत्साह दिसून आला. सकाळी सकाळी नागरिकांनी प्रत्येक मतदान केंद्रावर रांगा लावल्या असून नागरिकांचा मोठा उत्साह हा या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे.




