ब्रेकिंग

क-हे प्रीमियर लीग मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी – डॉ.जयश्रीताई थोरात

क-हे फाटा येथे अद्यावत मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू

क-हे प्रीमियर लीग मुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी – डॉ.जयश्रीताई थोरात

क-हे फाटा येथे अद्यावत मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू
तळेगाव दिघे । प्रतिनिधी । क्रिकेट हा भारतामध्ये आणि जगामध्ये अत्यंत लोकप्रिय खेळ ठरला आहे. संगमनेर तालुक्यातील अजिंक्य रहाणे पुनम खेमनर हे राष्ट्रीय पातळीवर खेळत असून क्रिकेट मुळे सांघिक भावना वाढते. क-हे येथे मागील चार वर्षापासून होत असलेल्या प्रीमियम लीगमुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठी संधी मिळत असल्याचे प्रतिपादन युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
जाहिरात

क-हे फाटा येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळ निमोण तळेगाव गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या प्रीमियम लीगच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी समवेत थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात, आर्किटेक्ट बि.आर.चकोर, जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सुभाष सांगळे, सरपंच सुभाष सानप, जेष्ठ कार्यकर्ते देवराव गुळवे,भास्कर तपासे, सुनील सानप,संतोष डोंगरे, भाऊसाहेब गीते, कीर्ती जायभाये,सुनील थोरात यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ.थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे यांची राजकारणा पलीकडची मैत्री होती. विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची मैत्री म्हणजे आनंदाचे पर्व. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा विचार आपल्या सर्व युवकांना पुढे न्यायचा आहे. क्रिकेट खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते याबरोबर आरोग्य चांगले राहते. व्यसनांपेक्षा छंद जोपासा आणि मोबाईल पेक्षा मैदानावर खेळा कारण आरोग्यासाठी ते अत्यंत चांगले आहे. मागील चार वर्षापासून सह्याद्रीच्या पायथ्याशी अत्यंत रम्य वातावरणात ही स्पर्धा होत असून ही प्रीमियम लीग दोन जिल्ह्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय ठरली आहे यामुळे दोन्ही जिल्ह्यातील युवकांना मोठी संधी मिळाली असल्याचे त्या म्हणाल्या.

तर इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या सीमेवर क्रिकेटची मेजवानी ही क्रीडाप्रेमींसाठी मोठी आनंदाची बाब आहे. नाशिक पुणे महामार्गावरून जाणारे अनेक प्रवासी या स्पर्धेचा आनंद घेत असतात. उत्कृष्ट आयोजक आणि राज्य पातळीवरील खेळाडू यांचा सहभाग यामुळे ही स्पर्धा अत्यंत लोकप्रिय झाली असल्याचे ते म्हणाले.तर इंजिनीयर सुभाष सांगळे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार वर्षापासून या प्रीमियम लीगचे आयोजन होत असून यामध्ये नाशिक व नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडू सहभागी होत आहेत. दर्जेदार आयोजनामध्ये स्थानिक युवकांचा मोठा सहभाग असून त्या सर्व युवकांच्या सहकार्याने ही स्पर्धा आता राज्य पातळीवर नेण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.यावेळी वृद्ध नागरिक युवक महिला व खेळाडूंची मोठी उपस्थिती होती. पुढील आठ दिवस या स्पर्धा सुरू राहणार असून या क्रिकेट स्पर्धांचा जास्तीत जास्त नागरिकांनी आनंद घ्यावा असे आवाहन क-हे ग्रामस्थ, युवक मंडळ, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे प्रतिष्ठान व लोकनेते बाळासाहेब थोरात मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!