पढेगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद


पढेगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

कोपरगाव । प्रतिनिधी । अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव वनपरिक्षेत्रातील व कोपरगाव तालुक्यातील पढेगावात धुमाकूळ घालणारा बिबट्या कोपरगाव वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे. कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याने, शेती करणे अवघड झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील पढेगाव शिवारात बिबटया चा वावर आढळला असून अनेक ग्रामस्थांनी बिबटया ला बघितले होते त्यामुळे परिसरात भीती निर्माण झाली होती सरपंच व ग्रामस्थ पढेगाव यांच्या मागणी नुसार अण्णासाहेब कारभारी शिंदे रा पढेगाव यांच्या शेतात वनविभागाने पिंजरा लावला होताआज दि 15 डिसेंबर 2025 रोजी सांयकाळी 7 च्या सुमारास बिबटया पिंजऱ्यात कैद झालायाची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ वनविभागाला दिली व वनकर्मचारी तात्काळ पढेगावात हजर झाले बिबट्याला बघण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली.सदर कार्यवाही उपवनसंरक्षक अहिल्यानगर श्री धर्मवीर सालविठ्ठल ,सहा वनसंरक्षक श्री जि पी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी कोपरगाव निलेश रोडे यांच्या निर्देशानुसार वनपाल भगवान जाधव, वनरक्षक अमोल किंकर , वनरक्षक श्रीमती श्रध्दा पडवळ , वनरक्षक श्रीमती निकीता पगारे, वनपाल सानप, अक्षय बडे, राहूल कानडे, विलास डगळे यांनी पिंजरा लावून बिबटया बंदिस्त करून पूर्ण केलीसदर बिबट्या सुमारे 4 ते 5 वर्षांचा आहे. सदर बिबट्याला डिग्रस रोपवाटिका राहुरी येथे हलविण्यात आले आहे



