ब्रेकिंग

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात वाढदिवसानिमित्त रमल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये

शिक्षणातून आदिवासी बांधवांची प्रगती नक्कीच - डॉ जयश्रीताई थोरात

जाहिरात
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात वाढदिवसानिमित्त रमल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये

कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात वाढदिवसानिमित्त रमल्या आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये

 शिक्षणातून आदिवासी बांधवांची प्रगती नक्कीच – डॉ जयश्रीताई थोरात
संगमनेर । प्रतिनिधी ।

थोरात परिवाराने सदैव समाजसेवेचे व्रत घेऊन समाज विकासासाठी काम केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी गावोगावी विकासाच्या योजना राबवण्याबरोबर तालुक्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण वाढविले आहे. ही शिक्षणाची गंगा आदिवासी वाडीपर्यंत पोहोचवली आहे. शिक्षणानेच आदिवासी बांधवांची प्रगती असल्याने सर्वांनी पूर्ण शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करावे असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना केले असून आपल्या वाढदिवसानिमित्त त्या या आदिवासी निरागस बालकांसमवेत रमल्या.

सावरचोळ व मेंगाळवाडी येथे वाढदिवसानिमित्त आदिवासी 500 विद्यार्थ्यांना  स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या यावेळी समवेत तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, सोमनाथ गोडसे ,नानासाहेब कानवडे, बाळकृष्ण गांडाळ, संदीप गोपाळे ,मधुकर  कानवडे , तुकाराम कानवडे , नाथू कातोरे  ललिता  गांडाळ ,  संजय कातोरे,   केशव बिडवे,   सोमनाथ मेंगाळ, लक्ष्मण मेंगाळ राजाराम भूतांबरे , सतीश कासार , किसन भागवत , सुनील कानवडे , अंगद बिडवे , रमेश मेंगाळ,  पोपट गांडाळ , पंढरीनाथ गांडाळ,साईनाथ गोरडे ऋषिकेश कानवडे, नवनाथ कानवडे, गोरक्षनाथ मेंगाळ, भाऊसाहेब मेंगाळ, अनिल भुतांबरे,विजय मेंगाळ,आदींसह सावरचोळ व मेंगाळवाडी मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रसंगी दोन्ही ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांना 500 स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले याचबरोबर डॉ. जयश्रीताई थोरात यांनी विद्यार्थ्यासमवेत अगदी हसत खेळत गप्पा मारत. त्यांना प्रोत्साहित केले. याचबरोबर त्यांच्या आरोग्याबाबतची माहिती घेऊन चांगल्या आरोग्याचे ही मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ थोरात म्हणाल्या की, आदिवासी बांधव हा डोंगरदऱ्यांमध्ये राहतो. या समाजाच्या विकासासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी विविध योजना राबवल्या आहेत. याचबरोबर यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनाही योग्य लाभार्थींना दिले आहेत. शिक्षण हे प्रगतीचे मुख्य साधन असल्याने आदिवासी वाडी मधील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी काम केले आहे.आदिवासी पालकांनीही आपल्या मुलांना शिक्षणात पूर्णपणे स्वातंत्र्य दिले पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी पूर्ण शिक्षण घेऊन कुटुंबाची स्वप्न पूर्ण केले पाहिजे. आपल्या आई-वडिलांनी खूप कष्ट केले आहेत त्यांना कष्टातून बाहेर काढण्यासाठी आपल्याला अभ्यासाची कष्ट घ्यावे लागतील याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी. याचबरोबर चांगला अभ्यास आणि चांगला व्यक्ती होण्यासाठी चांगले आरोग्य गरजेचे आहे आणि म्हणून प्रत्येकाने स्वच्छता, विविध आजारांची तपासणी वेळोवेळी केली पाहिजे. याचबरोबर शासनाच्या विविध योजनांचा लाभ ही घेतला पाहिजे.तुम्ही शिकले तर तुमचे कुटुंब आणि गाव मोठे होईल आणि त्याचा सर्वांना अभिमान राहील म्हणून प्रत्येकाने शिका आणि मोठे व्हा असा मंत्र त्यांनी दिला.

तर मिलिंद कानवडे म्हणाले की, शिरसगाव धुपे सावरचोळ मेंगाळवाडी या गावांच्या विकासाकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी अनेक योजना राबवले आहेत. साहेब कायम या गावांचा उल्लेख करतात. शिरसगाव तुपे सारख्या उंच ठिकाणी पिण्याच्या पाण्याची योजना सुरू केली आहे. विद्यार्थ्यांनी संगमनेर तालुक्यात असलेल्या शिक्षण संधीचा मोठा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तर प्रा बाबा खरात म्हणाले की, आदिवासींच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात मदत करण्यासाठी यशोधन कार्यालयात स्वतंत्र कक्ष करण्यात आला आहे. काहीही मदत लागली तरी आपण तातडीने यशोधन मध्ये येऊन संपर्क साधावा डॉ जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वात आपल्या सर्वांना तातडीने मदत केली जाईल असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण गांडाळ यांनी केले यावेळी शिक्षक व गावातील विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि लहानग्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात या गावोगावी अत्यंत लोकप्रिय आहेत. त्या वाढदिवसानिमित्त आपल्यामध्ये येणार आहेत. यामुळे सर्व विद्यार्थी नटून थटून आनंदीत होते. डॉ. जयश्रीताई आल्या विद्यार्थ्यांमध्ये बसल्या. त्यांच्याशी गप्पा मारल्या .त्यांना गाणी म्हणायला लावली आणि याचबरोबर प्रत्येकाला एक स्कूल बॅग मिळाली. चांगल्या शिक्षणाचा आणि चांगल्या आरोग्याचा मंत्र मिळाला. यामुळे या आदिवासी चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि हा दिवस कायम ध्यानात राहील असे आवर्जून सर्व सांगत डॉ. जयश्रीताई थोरात यांना आदिवासी गीत म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!