मराठी भाषा समजून घ्यायला पाहिजे – चंद्रकांत देशमुख
मराठी भाषा समजून घ्यायला पाहिजे – चंद्रकांत देशमुख
संगमनेर । विनोद जवरे ।
मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून संगमनेर साहित्य परिषदेने कालिका मंदिर सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. अरविंद रसाळ ( स्वरसंगमचे संस्थापक अध्यक्ष आणि लेखक ), प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत देशमुख ( श्री संत गाडगेबाबा भानुप्रभाकर सेवा प्रतिष्ठान संगमनेरचे मुख्य प्रवर्तक ) , सुवर्णाताई मालपाणी ( शारदा शिक्षण संस्था संगमनेर च्या अध्यक्ष ), डॉ.संतोष खेडलेकर ( महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ महाराष्ट्र राज्य ) चे सदस्य, के. सी खुराणा ( प्रसिद्ध उर्दू शायर ) आणि संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर , प्रकल्प प्रमुख शशांक गंधे हे व्यासपीठावर उपस्तित होते.
“सन १०१२ मध्ये पहिला शिलालेख आपल्याला मिळाला. त्यावर आठ ओळी होत्या. अक्षी या रायगड जिल्ह्यातील अलिबाग मधील गावात चंद्र आणि सूर्याची प्रतिमा असलेला हा शिलालेखावर संस्कृत आणि मराठी भाषा मिश्रीत होता. देवनागरीत हा लेख आहे. अकराव्या शतकात मराठी भाषा होती याचा पुरावा आहे. १२व्या शतकात मराठी भाषा लिखित होती. १२८४ च्या अगोदर मराठी भाषेचे अस्तित्व असले पाहिजे असे संकेत आहेत. १३व्या शतकात मराठीत संत-पंत-तंत यांचे साहित्य आले. आपले साहित्य ६०० इसवी सन या कालावधीत आपले साहित्य येथे त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आपल्याला मराठी भाषा कधीपासून निर्माण झाली आहे याचा विस्तृत उल्लेखनीय पुरावा पाहिजे . मराठीला अभिजात दर्जा मिळावा ही मागणी करताना आपल्याला स्वतःला मराठीचे भाषा किती समजली आणि नाही समजली तर ती समजण्यासाठी आपण काय प्रयत्न केले हे पाहिले पाहिजे. मराठी भाषा, मराठी शब्द आणि त्यांचे उच्चार हे मराठी माणसाला आलेच पाहिजे” असे उद्गार चंद्रकांत देशमुख यांनी काढले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप उदमले यांनी केले.
“संगमनेर साहित्य परिषदेने आज विविध प्रसिद्ध मराठी साहित्यिकांच्या साहित्याचे विवेचन येथे केले आणि मराठी अभंग,गाणी ऐकवली हे खूप कौतुकास्पद आहे” शालेय शिक्षण घेत असताना मराठी अधिक सखोलपणे शिकले पाहिजे. कलश या शब्दाचा वापर प्रसंग आणि वाक्य पाहून केला पाहिजे. शब्दाचा भावार्थ समजून त्याचा वापर केला पाहिजे नाहीतर अनर्थ होतो. यासाठी आपण सजग असले पाहिजे.
या कार्यक्रमात “मला आवडलेले साहित्यिक आणि त्यांचे लेख” या उपक्रमांतर्गत सुरेश परदेशी , अनघा खेडकर, अजित वैद्य, दर्शन जोशी, रघुनाथ वाघ , डॉ.सुधाकर पेटकर, दीपक क्षत्रिय , विजय दीक्षित, मंगला पाराशर, बाळकृष्ण महाजन, माधवी पाटील, दिलीप उदमले, स्मिता गुणे, नंदकिशोर बेल्हेकर यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध साहित्यिकांचे साहित्याची ओळख उपस्थितांना अनुभवता आली. या प्रकल्पाचे प्रमुख शशांक गंधे, रघुनाथ वाघ, लक्षमण ढोले यांनी परिश्रम घेतले.परिषदेचे क्रियाशील सदस्य मनोज साकी यांचा वाढदिवस या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास गिरीश सोमाणी, महेश गोडसे , किसन भाऊ हासे , उषा कपिले, हिरालाल पगडाल, विकास खेडकर, अंजली वैद्य ,सुप्रिया गवांदे,शेख इद्रीस , पूजा वाघ , प्रतिभा गुजराथी, सुरेंद्र गुजराथी , प्रवीण पंडित, गुलशन डंग, सुखदेव ईल्हे, बाळासाहेब पिंगळे, दिलीप क्षीरसागर , प्रकाश शिंदे, रामचंद्र कपिले, शोभा काळे. स्मिता देशमुख , मालती गोरडे , शोभा बाप्ते , तनुश पठाडे , अडव्होकेट कैलास हासे, प्रा.शेवाळे , मारुती शिंदे, डॉ. जी. पी. शेख, परशराम शिंदे, गणेश बुळकुंडे, दैनिक युवाधेय्यचे संपादक लहानू सदगीर सविता गाडेकर, यश गाडेकर आणि संगमनेरमधील अनेक मान्यवर आणि साहित्यिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दर्शन जोशी यांनी केले आणि आभार ज्ञानेश्वर राक्षे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमनेर साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांनी खूप परिश्रम घेतले.